AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पती पेट्रोलसाठी रांगेत उभा तर इकडे गृहिणींचीही वाढली चिंता… किचन बजेटवर मोठा हल्ला? खाद्यतेलही महागणार? नुसता डावात मचाळा

Edible Oil More Expensive: एकीकडे राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. किती दिवसांचा इंधन साठा उरला यावरून द्वंद सुरू असतानाच अजून एक महागाईचा बॉम्ब पडणार आहे. खाद्यतेल महागण्याची शक्यता आहे.

पती पेट्रोलसाठी रांगेत उभा तर इकडे गृहिणींचीही वाढली चिंता... किचन बजेटवर मोठा हल्ला? खाद्यतेलही महागणार? नुसता डावात मचाळा
खाद्यतेलही महागणार?Image Credit source: AI इमेज
| Updated on: May 20, 2026 | 12:22 PM
Share

Edible Oil More Expensive: जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा भडकण्याची दाट शक्यता आहे. बायोफ्युएलची मागणी वाढली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात पॉम तेलाच्या (Palm Oil) किंमती रेकॉर्डब्रेक वाढल्या आहेत. दोन आठवड्यातील सर्वाधिक भाव आहे. मलेशियातील बाजारात पाम तेलाचा भाव 4,600 रिंग्गित प्रति टन इतका आहे. वायदे बाजारात बायोफ्युएल धोरणामुळे व्हेजिटेबल ऑईलच्या, खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. जून महिन्यातही किंमती वाढण्याची दाट शक्यता आहे.

जून महिन्यात महागाई डोक्यावर नाचणार

जागतिक स्तरावर मलेशिया आणि इंडोनेशिया हे दोन देश पाम तेल पुरवठ्यातील अव्वल निर्यातदार आहेत. एप्रिल महिन्यात पाम तेलाच्या किंमती 4,800 रिंग्गित प्रति टनावर पोहचल्या होत्या. हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक भाव आहे. त्यानंतर किंमतीत घसरण झाली होती. आता मागणी अधिक आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती असल्याने पाम तेलाच्या किंमती भडकल्या आहेत.

मलेशिया पाम ऑईल एलायन्स आणि मलेशियन पाम ऑईल बोर्डाच्या (MPOB) ताज्या आकडेवारीनुसार जून महिन्यात कच्च्या पाम तेलाच्या किंमती सरासरी RM 4,400 प्रति टनाच्या जवळपास आहेत. मार्च ते ऑक्टोबर हा कालावधी पाम तेल उत्पादनासाठी सर्वात अनुकूल मानल्या जातो. या दरम्यान पाम तेलाचे उत्पादन सर्वाधिक होते. फळातून अधिक प्रमाणात तेल काढल्या जाते. पण यंदा एप्रिल महिन्यात मलेशियातील पाम तेलाच्या साठ्यात अगदी किरकोळ वाढ झाली आहे. पाम तेल साठा अवघा 2.31 दशलक्ष टनावरच पोहचू शकला आहे.

अमेरिकेच्या खेळीने महागले पाम तेल

पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि सीएनजीच्या किंमती अमेरिकेन धोरणामुळे भडकल्या आहेत. जगात अस्थिरता निर्माण करण्याचे काम अमेरिकेकडून करण्यात येत असल्याचा आरोप इराणसह इतर देश करत आहेत. अमेरिकेच्या खेळीमुळे पाम तेल महागले आहे. अमेरिकेत बायोफ्युएल क्षेत्रात सोयाबीनची मोठी मागणी होत आहे. सोयाबीन तेलाच्या किंमतीत युरोपमध्ये मोठी वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2022 नंतर या किंमती वाढल्या आहेत. जगभरात सोयाबीन तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. त्यामुळे पाम तेलाला अधिक मागणी आली आहे. पाम तेलाचे कमी उत्पादन झाल्याने सध्या किंमती कडाडल्या आहेत.

मलेशियाने या वर्षाच्या सुरुवातीच्या चार महिन्यात 25.5 टक्के म्हणजे जवळपास 1.1 दशलक्ष टन पाम तेल निर्यात केले. आतापर्यंत या देशाने 5.38 दशलक्ष टन पामतेल निर्यात केले. वर्ष 2019 नंतरची ही सर्वात मोठी निर्यात मानली जात आहे. पण एप्रिल महिन्यात निर्यातीत घसरण आली आहे. पाम तेलाचे उत्पादन वाढल्यानंतर जागतिक बाजारातील किंमती निच्चांकावर येण्याची शक्यता आहे.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?