AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPS शिवदीप लांडे यांची राजीनामा दिल्यानंतरही जबरदस्त कामगिरी, या कारणामुळे संपूर्ण पोलीस ठाण्याला केले सस्पेंड

ips shivdeep lande: 28 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयाकडून मागितलेला अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने महानिरीक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढ्या मोठ्या घटनेनंतरही अशा प्रकारची उदासीन वृत्ती पोलीस ठाण्याचे प्रमुख, सहायक पोलीस ठाणे आणि पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी दर्शवते, असे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.

IPS शिवदीप लांडे यांची राजीनामा दिल्यानंतरही जबरदस्त कामगिरी, या कारणामुळे संपूर्ण पोलीस ठाण्याला केले सस्पेंड
ips shivdeep lande
| Updated on: Oct 09, 2024 | 9:49 AM
Share

ips shivdeep lande: महाराष्ट्रातील रहिवाशी आणि सिंघम म्हणून ओळख असलेल्या आयपीएस शिवदीप लांडे बिहार केडरमध्ये आहेत. त्यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यातील आक्रमकपणा कायम आहे. आता त्यांनी बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील खजांची हाट पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. तनिष्क शोरुममधील तीन कोटी ज्वेलर लूट प्रकरणात त्यांनी ही कारवाई केली. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडली. तसेच त्यांनी एसडीपीओ विरुद्ध विभागीय चौकशी करण्याची शिफारस केली आहे.

आरोपींना न पकडल्याबद्दल नाराजी

पूर्णिया विभागाचे पोलीस महानिरीक्षकपदी (आयजी) शिवदीप लांडे यांचे महिन्याभरापूर्वी बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आयपीएसचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झाला नाही. आता आयजी शिवदीप लांडे यांनी पूर्णिया येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. त्यात तनिष्क शोरुमधील ज्वेलरी मिळवण्यात आलेले अपयश आणि मुख्य आरोपींना अद्यापर्यंत न झालेल्या अटकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

भरदिवसा पडला होता दरोडा

26 जुलै रोजी पूर्णिया शहरातील बाजारपेठेत असलेल्या तनिष्क शोरुममध्ये भरदिवसा दरोडा पडला होता. त्यात दरोडेखोरांना 3.70 कोटींचा ऐवज लंपास केला होता. त्यासंदर्भात शिवदीप लांडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दुपारी 12 वाजता भरवस्तीत दरोडा पडला होता. त्यामुळे संपूर्ण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण झाले आहे. शोरुमधील कर्मचाऱ्यांना बंधक बनवून तीन कोटींची लूट केली जाते. त्याला दोन महिने झाल्यावरही पोलीस आरोपींना पकडू शकत नाही. तीन कोटीच्या लुटीतील फक्त एक आंगठी जप्त करण्यात आली. पोलिसांकडे सर्व प्रकारच्या सुविधा असताना शोरुमजवळ गस्त होत नव्हती.

एसडीपीओ पुष्कर कुमार यांच्यावर ठपका

28 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयाकडून मागितलेला अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने महानिरीक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढ्या मोठ्या घटनेनंतरही अशा प्रकारची उदासीन वृत्ती पोलीस ठाण्याचे प्रमुख, सहायक पोलीस ठाणे आणि पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी दर्शवते, असे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. एसडीपीओ पुष्कर कुमार यांच्यावर टिप्पणी करताना, आयजींनी लिहिले की त्यांना या घटनेबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती किंवा त्यांचे पोलिस अधिकाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नव्हते. तसेच या घटनेनंतरही त्यांच्या स्तरावरून लुटलेले दागिने मिळवण्यासाठी कोणतीही स्वारस्य दाखवले नाही, ही बाब खेदजनक आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.