AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRCTC : तासभर ठप्प झाल्यानंतर IRCTC ची वेबसाइट सुरु

IRCTC DOWN : सोमवारी सकाळी IRCTC चा वेबसाइट ठप्प झाली होती. त्यामुळे तिकीट बुक करता येत नव्हतं. त्यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. आता ही वेबसाइट पूर्ववत झाली आहे.

IRCTC : तासभर ठप्प झाल्यानंतर IRCTC ची वेबसाइट सुरु
Indian Railway
| Updated on: Dec 09, 2024 | 2:14 PM
Share

देशभरात रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी वेबसाइट IRCTC.CO.IN सोमवारी जवळपास एक तासासाठी बंद झाली होती. त्यामुळे लाखो प्रवाशांना तिकीट बुक करता आली नाही तसच तिकीट कॅन्सलही करु शकले नाहीत. IRCTC कडून देण्यात आलेल्या डाउनटाइम संदेशानुसार ई-टिकटिंग सेवा देखभालीसाठी अनुपलब्ध होती. यूजर लॉगइन करायचे, त्यावेळी त्यांना संदेश येत होता की, “मेंटेन्सच्या कामासाठी पुढच्या तासाभरासाठी ई-टिकटिंगची सेवा उपलब्ध नसेल. कृपया नंतर प्रयत्न करा. तिकीट रद्द करण्यासाठी/TDR दाखल करण्यासाठी कृपया ग्राहकांनी सेवा नंबर 14646, 0755-6610661 आणि 0755-4090600 कॉल करावा किंवा etickets@irctc.co.in वर मेल करावा…”

IRCTC ची वेबसाइट सोमवारी सकाळी ठप्प झाली होती. त्यामुळे रेल्वे तिकीटांची बुकिंग बंद झाली होती. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. महत्त्वाच म्हणजे तत्काळ तिकीट बुकिंगच्यावेळी ही IRCTC ची वेबसाइट ठप्प झाली. IRCTC ने स्टेटमेंट जारी करुन साइटच्या मेंटेनेंसच काम चालू असल्याच सांगितलं. त्यामुळे 1 तास IRCTC वरुन कुठलही बुकिंग करता येणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. IRCTC ची सर्विस डाऊन झाल्यामुळे तात्काळ तिकिट बुक करणाऱ्यांना अडचणी आल्या.

सायबर हल्ल्याची शंका

IRCTC ची सर्विस डाऊन झाल्यामुळे तात्काळ तिकिट बुक करणाऱ्यांना अडचणी आल्या. डाउनडिटेक्टरने वेबसाइटच्या आउटेजची पुष्टि केली आहे. IRCTC सर्विस डाउन झाल्यानंतर एक्स वर TATKAL आणि IRCTC दोन कीवर्ड ट्रेंड करत होते. सामान्यत: मेंटेनेंसच काम रात्री 11 वाजल्यानंतर चालतं. हा सायबर हल्ला तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली गेली.

सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

तिकीट कॅनशलेशन करण्यासाठी लोकांना कस्टमर केअर नंबरवर फोन करायला ईमेल करायला सांगितलं. सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडला. लोकांनी सोशल मीडियावरुन आपली नाराजी व्यक्त केली. IRCTC ला टॅग करुन लोक अनेक प्रश्न विचारत होते.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.