14 मार्चपासून रेल्वे रुळांवर धावणार लक्झरी Golden Chariot, जाणून घ्या काय आहे खास?

2020 मध्ये IRCTC कडून ही रेल्वे ऑपरेशन, मार्केटिंग आणि मेंटेनन्ससाठी टेक ओव्हर करण्यात आली. गोल्डन चॅरिएट आता पुन्हा एकदा नव्या रुपात रेल्वे रुळांवरुन धावताना दिसणार आहे.

14 मार्चपासून रेल्वे रुळांवर धावणार लक्झरी Golden Chariot, जाणून घ्या काय आहे खास?

नवी दिल्ली : IRCTC टूरिझम अनेक लक्झरी गाड्या चालवते. त्यातील एक म्हणून गोल्टन चॅरिएट. केएसटीसी अर्थात (Karnataka State Tourism Development Corporation)च्या मालकीची असलेल्या गोल्डन चॅरिएट या रेल्वेची सुरवात 2008 मध्ये करण्यात आली होती. 2020 मध्ये IRCTC कडून ही रेल्वे ऑपरेशन, मार्केटिंग आणि मेंटेनन्ससाठी टेक ओव्हर करण्यात आली. गोल्डन चॅरिएट आता पुन्हा एकदा नव्या रुपात रेल्वे रुळांवरुन धावताना दिसणार आहे.(IRCTC’s Yatra Special Golden Chariot Railway will start from March 14)

कोणत्या ठिकाणांवर प्रवास करता येणार?

गोल्डन चॅरिएट अनेक निसर्गसंपन्न आणि सुंदर जागांवरुन तुम्हाला सैर करवते. त्यात दक्षिण भारतातील ऐतिहासिक स्थळांचा समावेश आहे. 14 मार्चपासून या प्रवासाला सुरुवात होणार आहेत. त्यात 6 रात्री आणि 7 दिवसांची ही यात्रा असेल. ही यात्रा कर्नाटकातून सुरुवात होऊन ती बंगळुरुमध्ये संपेल. त्यात बांदीपूर, म्हैसूर, हैलेबिडू, चिकमंगलूर, हम्पी, ऐहोले आणि पत्तदकल आणि गोवा या ठिकाणांचाही समावेश असणार आहे.

यानंतर अजून एका ट्रिपचं प्लॅनिंग तुम्ही करु शकणार आहात. ही ट्रिप 3 ते 4 रात्रीची असणार आहे. यातही तुमच्या प्रवासाला कर्नाटकमधून सुरुवात होईल आणि बंगळूरुमध्ये यात्रा संपेल. यात म्हैसूर, हम्पी आणि महाबलीपुरम या डेस्टिनेशनचा समावेश असणार आहे.

IRCTC 14 मार्च 2021 पासून गोल्डन चॅरिएटद्वारे पुन्हा एकदा यात्रा सुरु करत आहे. KSTDC द्वारे संचलित ही रेल्वे प्रवाशांच्या अभावी बंद करण्यात आली होती.

गोल्डन चॅरिएटची खास वैशिष्ट्ये –

>> या रेल्वेमध्ये वायफाय, ओटीटी स्ट्रिमिंग, बियर आणि वाईन, इंटरनॅशनल आणि इंडियन जेवणाची सोय असणार आहे.

>> कल्चरल परफॉर्मंन्स, स्मारकाचे एन्ट्री तिकीट, ऑफ बोर्ड इव्हिनिंग विथ मील आणि अशा अनेक सुविधा उपल्बध करुन दिल्या जातात.

>> प्रत्येक गेस्ट कॅरेजमध्ये ट्वीन आणि डबल मिक्स केबिन आहे. त्यात 13 डबल बेड केबिन आणि 30 ट्वीन बेड केबिन आहेत. तसंच 1 केबिन दिव्यांगांसाठीही आहे

>> या रेल्वेत 2 रेस्टॉरंट आहे. त्यात जेवणाची अत्यंत चांगली सोय असते. त्याचबरोबर ड्रिंक करण्याचीही सोय आहे. त्यात वाईन, बियर आणि सॉफ्ट ड्रिंक्सचा समावेश आहे.

>> आरोग्यासाठी स्पा कम फिटनेस सेंटर आहे. इथं अनेक आयुर्वेदिक स्पा थेरेपी केल्या जातात आणि मॉडर्न वर्कआऊट मशीनही उपलब्ध आहेत.

> या पॅकेजमध्ये निवडक होम मेड पेय पदार्थांसह अनेक दुसरे ऑप्शन्सही मिळतील. त्याचबरोबर प्रवाशी आता ऑनबोर्ड स्पा थेरेपीसह रिलॅक्स करु शकतात.

संबंधित बातम्या :

आता धावत्या रेल्वेत प्रवासी बोर होणार नाहीत! रेल्वे याच महिन्यात सुरु करणार नवी सुविधा

Indian Railway : रेल्वे स्थानकांवरील सेवानिवृत्त खोल्या पुन्हा सुरु करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

IRCTC’s Yatra Special Golden Chariot Railway will start from March 14

Published On - 9:39 pm, Mon, 8 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI