तो सेक्स एडिक्ट होता, दिवसातला बराच वेळ फक्त…, IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

तो सेक्स एडिक्ट होता, कॉल गर्ल्स साठी करायचा विचित्र काम... दिवसातला बराच वेळ तो फक्त.... IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा... पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा खरा चेहरा समोर...

तो सेक्स एडिक्ट होता, दिवसातला बराच वेळ फक्त..., IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
| Updated on: Apr 25, 2026 | 1:20 PM

महिलांवर सतत होत असलेल्या अत्याचारांमुळे देशात महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे… दरम्यान, दिल्ली येथे घडलेल्या घटनेने तर, देशात खळबळ उडाली आहे. IRS अधिकाऱ्याच्या घरात पूर्वी काम करत असलेल्या राहुल मीणा याने अभिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. घटना समोर आल्यानंतर सर्वांच मन विचलित झालं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चौकशीत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली, IRS अधिकाऱ्याच्या लेकीसोबत वाईट कृत्य करण्यापूर्वी राहुल याने विवाहित महिलेचा देखील बलात्कार केला…

महिलांवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आणखी एक नवीन खुलासा झाला आहे. आरोपी राहुल याला फक्त गेम खेळण्याचं वेड नव्हतं तर, तो सेक्साहोलिक मानसिकतेचा आहे… म्हणजेच, लैंगिक इच्छेने विचलित झालेली व्यक्ती. पोलीस चौकशीदरम्यान, आरोपीने ऑनलाइन गेमिंगचे व्यसन आणि लैंगिक व्यसन दोन्ही असल्याचं कबूल केलं.

राहुल त्याला जास्त वेळ फक्त अश्लील आणि घाणेरडे व्हिडीओ पाहण्यात घालवत होता. एक प्रकारे या सगळ्या गोष्टींची त्याला सवयच लागली होती. अशा प्रकारे खुद्द आरोपीने स्वतःबद्दल विचित्र खुलासे केले आहेत. राहुल गेम खेळून पैसे कमवायचा. ज्यामुळे त्याला कॉल गर्ल्सवर पैसे उडवता येतील…

आरोपीने असा देखील खुलासा केला आहे की, मुलीची हत्या केल्यानंतर राहुल चोरीचा फोन वापरत होता… त्याने मित्राच्या बायकोचा फोन चोरला होता… असं सांगण्यात येत आहे की, त्याचं महिलेचा बलात्कार करुन राहुल दिल्लीत आलेला. जेथे त्याने अधिकाऱ्याच्या मुलीचा बलात्कार करून तिची हत्या केली. स्वतःला वाचवण्यासाठी त्याने फोन देखील विकला, ज्या फोनच्या शोधात पोलीस होते. राजस्थान येथे आरोपीने स्वतःचा फोन विकला… याप्रकरणी आता पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

सध्याचं चित्र पाहता, राजधानी दिल्लीत महिलांच्या सुरक्षेबद्दल मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे… महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत दिवसागणिक फक्त वाढच होत आहे… त्यामुळे महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोपी राहुल मीना याची अशी कोणती मानसिकता होती की त्याने 12 तासांत दोन बलात्कार आणि असा घृणास्पद खून केला. सध्या आरोपीची पुढील चौकशी सध्या सुरू आहे.

Follow Us