AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्रिशा कृष्णन टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार; थलपती विजय यांच्यासाठी पोटनिवडणूक लढवणार?

थलपती विजय यांनी तमिळनाडूचे भावी मुख्यमंत्री होण्याचा दावा केला असतानाच त्रिशा कृष्णन त्यांच्या टीव्हीके पक्षाकडून राजकारण प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चा कशामुळे होत आहेत, ते जाणून घ्या..

त्रिशा कृष्णन टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार; थलपती विजय यांच्यासाठी पोटनिवडणूक लढवणार?
Thalapathy Vijay and Trisha Krishnan Image Credit source: Instagram
| Updated on: May 07, 2026 | 10:06 AM
Share

तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता थलपती विजय यांनी राजकारणात धमाकेदार पदार्पण केलं आहे. त्यांचा ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) हा 2026 च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. या निवडणुकीत टीव्हीकेचा 234 पैकी 108 जागांवर विजय झाला असून बहुमताच्या आकड्यापासून केवळ 10 जागा दूर आहे. विजय यांनी स्वत: तिरुचिरापल्ली पूर्व आणि पेरांबूर या दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवली होती आणि या दोन्ही ठिकाणी त्यांचा विजय झाला आहे. बुधवारी त्यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी चेन्नईतल्या लोकभवन इथं राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेतली. तर दुसरीकडे विजय यांचं वैयक्तिक आयुष्यसुद्धा प्रकाशझोतात आलं आहे. आता त्यांची कथित प्रेयसी त्रिशा कृष्णनसुद्धा लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

तिरुचिरापल्ली पूर्वची जागा त्रिशा लढवणार?

थलपती विजय यांना नियमांनुसार निवडणुकीत जिंकलेल्या दोन्ही जागा राखता येणार नाहीत. त्यामुळे 14 दिवसांच्या आत एक जागा रिक्त करावी लागणार आहे. त्यामुळे जी जागा विजय सोडतील, त्या मतदारसंघात पोटनिवडणूक होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय पेरांबूर मतदारसंघ राखू शकतात आणि तिरुचिरापल्ली पूर्वची जागा ते सोडू शकतात. आता टीव्हीकेच्या या रिक्त जागेसाठी थलपती विजय हे गर्लफ्रेंड त्रिशा कृष्णनलाच उमेदवारी देण्याची चर्चा आहे. परंतु कोणताही राजकीय अनुभव नसल्यामुळे ती राजकारणात येण्यास संकोच करत असल्याचं वृत्त आहे.

विजय आणि त्रिशा यांच्या अफेअरच्या चर्चा

विजय आणि त्रिशा यांच्या नात्याबद्दलच्या अफवा गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. ‘घिली’, ‘तिरुपाची’, ‘कुरवी’, ‘लिओ’ यांसारख्या चित्रपटांमधून ही जोडी प्रेक्षकांमध्ये तुफान हिट झाली. ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि ऑफस्क्रीन मैत्री.. या दोन्ही कारणांमुळे प्रेक्षकांमध्ये विजय आणि त्रिशा लोकप्रिय आहेत. त्यातच फेब्रुवारीमध्ये विजय यांची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यात त्यांनी विजय यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर विजय आणि त्रिशा एका विवाहसोहळ्याला एकत्र उपस्थित राहिले होते. विजय आणि संगीता यांनी 1999 मध्ये लग्न केलं असून या दोघांना दोन मुलं आहेत.

विजय किंवा त्रिशा यांनी अद्याप त्यांच्या नात्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु टीव्हीकेच्या विजयानंतर त्रिशा विजय यांच्या घरी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली होती. त्यातही निकालाच्या दिवशी त्रिशाचा वाढदिवस असल्याने सोशल मीडियावर मीम्स महापूर आला होता. आता त्रिशासुद्धा राजकारणात पाऊल ठेवत टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच