AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकच्या कुरापती वाढल्या, ISIकडून भारतीय फोन नंबरचा वापर, लष्कराची माहिती मिळवण्यासाठी भारतातील टोल नाक्यांवर फोन

लष्कराची किती वाहनं टोलनाक्यावरून गेली याचीही विचारपूस करण्यात आली आहे. पंजाबमधील टोलनाक्यांना आयएसआयचे फोन आल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. भारतीय फोन नंबरचा वापर करून माहिती काढून घेण्यात येत आहे.

पाकच्या कुरापती वाढल्या, ISIकडून भारतीय फोन नंबरचा वापर, लष्कराची माहिती मिळवण्यासाठी भारतातील टोल नाक्यांवर फोन
ISIकडून भारतीय फोन नंबरचा वापरImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 29, 2025 | 10:36 AM
Share

पाकिस्तानच्या आयएसआयकडून भारतीय फोन नंबरचा वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. भारतातील टोलनाक्यांवर फोन करून लष्कराची माहिती घेतली जात आहे. लष्कराची किती वाहनं टोलनाक्यावरून गेली याचीही विचारपूस करण्यात आली आहे. पंजाबमधील टोलनाक्यांना आयएसआयचे फोन आल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. भारतीय फोन नंबरचा वापर करून माहिती काढून घेण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

पाकिस्तानकडून ही नवी कुरापत काढण्यात आली आहे. पहलगाममधील हल्यानंतर भारातने कठोर पावलं उचलली, त्यानंतर पाकिस्तानकडून बॉर्डरवर गोळीबार करण्यात आला. त्यामुळे वातावरण आणखी धुमसलं.  तर आता दुसऱ्या बाजूला त्यांनी ही वेगळी कार्यपद्धत अवलंबली आहे. आयएसआय या त्यांच्या संघटनेसह इतर संघटनांचे लोकं भारतामध्ये ही चौकशी करत आहेत.

गेल्या आठवड्यात पहलगाममधील बैसरन व्हॅलीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बॉर्डवरूल सर्व राज्यांमध्ये अलर्ट देण्यात आला होता, लष्करी हालचालीही वाढल्या. सध्या बॉर्डरच्या दिशेने जाणाऱ्या आर्मी किंवा एअरफोर्सच्या ज्या गाड्या आहेत, त्यांची माहिती काढण्याचा प्रयत्न आयएसआयकडून सुरू आहे. त्यासाठी भारतीय मोबाईल क्रमांक वापरून टोल नाक्यांवर फोन करून माहिती विचारली जात आहे.

कुठे आला पहिला फोन ? 

मिळालेल्या माहितीनुसार, जालंधर येथील टोलनाक्यावर पहिला फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने आपण स्वत: लष्करी अधिकारी बोलत असल्याचा दावा करत लष्कराची किती वाहनं आत्तापर्यंत गेल्याचे विचारण्यात आले. मात्र तो पाकिस्तानमधून आल्याचे उघड झाले. जालंधरप्रमाणेच पठाणकोठ-अमृतसर रस्त्यावरील लाडपालवट टोल प्लाझा तिटोथेही काल दुपारी दीडच्या सुमारास फोन आला होता. एवढंच नव्हे तर चोलांगे टोल प्लाझा, हरसे मानसर टोल प्लाझा याठिकाणी देखील काल दुपारी 3.15 आणि 3.45 च्या सुमारास फोन आला होता आणि लष्कराच्या वाहनांबद्दल माहिती विचारण्यात आली होती.

यापुढे  टोलप्लाझांवर जे फोन येतील त्याची माहिती लष्कराकडून घेतली जाणार आहे आणि पाकिस्तानपरयंत कोणतीही महत्वाची माहिती पोहोचू नये याची खबरदारीदेखील लष्कराकडून घेतली जाणार आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत