AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चांद्रयान-5 बाबत PM मोदींची मोठी घोषणा, भारताची इस्रो आणि जपानची जॅक्सा एकत्र काम करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांद्रयान-5 मोहिमेबाबत महत्वाची माहिती दिली आहे. या मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (जॅक्सा) या संस्था एकत्र काम करणार असल्याचे मोदींनी म्हटलं आहे.

चांद्रयान-5 बाबत PM मोदींची मोठी घोषणा, भारताची इस्रो आणि जपानची जॅक्सा एकत्र काम करणार
Chandrayan 5
| Updated on: Aug 29, 2025 | 10:09 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात भारत आणि जपान यांच्यातील अनेक करारांवर सह्या केल्या जात आहेत. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांद्रयान-5 मोहिमेबाबत महत्वाची माहिती दिली आहे. या मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (जॅक्सा) या संस्था एकत्र काम करणार असल्याचे मोदींनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो येथे जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर मोदींनी भारत आणि जपान यांच्यातील अंतराळ संस्थांच्या युतीची घोषणा केली. पंतप्रधान म्हणाले की, चांद्रयान-5 मोहिमेसाठी इस्रो आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (जॅक्सा) हे एकत्र काम करणार आहे. मी या पार्टनरशीपचे स्वागत करतो. आमच्याकील युती आता पृथ्वीच्या सीमा ओलांडून जाणार आहे, आणि ती अवकाशात मानवजातीच्या प्रगतीचे प्रतीक बनेल.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही पुढील दशकासाठी एक रोडमॅप तयार केला आहे. आज आमच्यात झालेली चर्चा खूप महत्वाची होती. जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आणि चैतन्यशील लोकशाही म्हणून आमची पार्टनरशीप केवळ दोन्ही देशांसाठीच नव्हे तर जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी महत्त्वाची आहे.

जपान भारतात 10 ट्रिलियन येनची गुंतवणूक करणार

आज दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करार झाले. यानंतर माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पुढील 10 वर्षांत जपानकडून भारतात 10 ट्रिलियन येनची गुंतवणूक केली जाणार आहे. जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी भारत-जपान सहकार्य महत्त्वाचे आहे. गुंतवणूक, नवोपक्रमासह अनेक क्षेत्रात सहकार्यासाठी आम्ही 10 वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे.

दहशतवाद आणि सायबर सुरक्षेबाबत भारत आणि जपानने चिंता व्यक्त केली आहे. संरक्षण आणि सागरी सुरक्षेला प्रोत्साहन देण्यात दोन्ही बाजूंकडून समान प्रयत्न केले जात आहेत. भारत-जपान पार्टनरशीप परस्पर विश्वासावर आधारित आहे. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी, ‘पुढच्या पिढीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या ताकदीचा वापर करण आवश्यक असल्याचे विधान केले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.