चंद्रयान-2: केवळ 335 मीटरनं ‘विक्रम’ हुकला, सॉफ्ट-लँडिंगमधील त्रुटी सापडल्या

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) चंद्रयान 2 (Chandrayaan-2) मधील विक्रम लँडरच्या (Vikram Lander) सॉफ्ट लँडिंगचं (Soft Landing) अपयश शोधलं आहे.

चंद्रयान-2: केवळ 335 मीटरनं ‘विक्रम’ हुकला, सॉफ्ट-लँडिंगमधील त्रुटी सापडल्या

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) चंद्रयान 2 (Chandrayaan-2) मधील विक्रम लँडरच्या (Vikram Lander) सॉफ्ट लँडिंगचं (Soft Landing) अपयश शोधलं आहे. टेलीमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड सेंटरमध्ये यावर सखोल विश्लेषण करण्यात आलं. यानुसार लँडर ‘विक्रम’ चंद्रापासून 5 किलोमीटरवर असताना शेवटच्या ‘फाईन ब्रेकिंग फेज’मध्ये त्रुटी आल्या. त्यामुळेच लँडिंग अयशस्वी झालं.

विक्रम लँडर 2.1 किलोमीटर उंचीवर असेपर्यंत त्याचा सामान्य प्रवास झाला. त्यानंतर अचानक त्याच्याशी संपर्क तुटला. द इंडियन एक्‍सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, “मोहिमेच्या नियंत्रण कक्षात लावलेल्या स्‍क्रिनवर लँडर चंद्रापासून 335 मीटर अंतरावर असताना संपर्क तुटल्याचं दिसत आहे. स्‍क्रिनवरील लँडरचे स्थान दाखवणारा हिरवा बिंदू 2 किलोमीटर उंचीपासून त्याचा मार्ग बदलण्यास सुरुवात झाली आणि 1 किमी ते 500 मीटरदरम्यान तो थांबला.”

दरम्यान, लँडरच्या मॉड्यूलची ‘वर्टिकल व्हेलॉसिटी’ (Vertical Velocity) 59 मीटर/सेकंद आणि हॉरिझॉन्‍टल व्हेलॉसिटी 48.1 मीटर/सेकंद होती. त्यावेळी लँडर आपल्या लँडिंग पॉईंटपासून जवळपास 1.09 किलोमीटर दूर होता. इस्रोच्या नियोजित प्रक्रियेनुसार विक्रम लँडर 400 मीटर दूर असताना त्याचा वेग अत्यंत कमी असणं अपेक्षित होतं. त्यानंतर तो लँडिंग साईटवर अवकाशात भ्रमण करणार होता. यात विक्रमची नेव्हिगेशन सिस्‍टम स्वयंचलितपणे आपले निर्णय घेत होती.

लँडरचा वेग 1680 मीटर/सेकंदपासून 0 मीटर/सेकंदपर्यंत आणण्यासाठी त्यात 800 N चे 4 लिक्विड फ्यूईल इंजिन बसवण्यात आले होते. प्रत्येक इंजिनमध्ये 8 थर्स्‍टर्स होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *