अभिमानास्पद! इस्रोने एकाच वेळी अवकाशात सोडले 9 उपग्रह, इस्रोच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून एकाच वेळी 9 उपग्रह अवकाशात सोडले. हे उपग्रह भारतासाठी कशाप्रकारे महत्त्वाचे आहेत जाणून घेऊया.

अभिमानास्पद!  इस्रोने एकाच वेळी अवकाशात सोडले 9 उपग्रह, इस्रोच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव
ओशनसॅट-3Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 1:11 PM

श्रीहरिकोटा,  ISRO ने आज 26 नोव्हेंबरला सकाळी 11.56 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवरून OceanSat-3 (OceanSat) उपग्रह प्रक्षेपित केला. PSLV-XL रॉकेटने या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. यासोबतच भूतानसाठी विशेष रिमोट सेन्सिंग उपग्रहासह आठ नॅनो उपग्रहही प्रक्षेपित करण्यात आले. भुतानसाठी पाठविण्यात आलेला उपग्रह भूतानसॅट  हा भारत-भूतानचा संयुक्त उपग्रह आहे. हा नॅनो उपग्रह आहे. यासाठी भारताने भूतानला तंत्रज्ञान हस्तांतरित केले आहे. भूतानसॅटमध्ये रिमोट सेन्सिंग कॅमेरे आहेत. म्हणजेच हा उपग्रह जमिनीची माहिती देणार आहे. रेल्वे रुळ बनवणे, पूल बांधणे आदी विकास कामांनासाठी या उपग्रहाचा वापर केला जाईल. यात मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा देखील आहे. म्हणजेच सामान्य छायाचित्रांबरोबरच वेगवेगळ्या प्रकाश लहरींच्या आधारे छायाचित्रे टिपल्या जातील. इस्रोच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

OceanSat-3 चा असा होणार फायदा

डेटा रिसेप्शन भूतानमध्ये भारताच्या सहकार्याने तयार केलेल्या केंद्रात होईल.  भारत भूतानमध्ये ग्राउंड स्टेशन विकसित करत आहे. OceanSat-3 समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, क्लोरोफिल, फायटोप्लँक्टन, एरोसोल आणि प्रदूषण यांचेही परीक्षण करेल. हा 1000 किलो वजनाचा उपग्रह आहे. ज्याला ISRO Earth Observation Satellite-6 (EOS-6) असे नाव देण्यात आले आहे.

समुद्री सीमांवरही राहणार लक्ष

Oceansat-1 प्रथम 1999 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले. यानंतर 2009 मध्ये त्याचा दुसरा उपग्रह अवकाशात स्थापित करण्यात आला. मध्ये Oceansat-3 लाँच करण्याऐवजी SCATSAT-1 पाठवण्यात आला. कारण Oceansat-2 निरुपयोगी झाले होते. ओशनसॅटबद्दल असे म्हटले जाते की याद्वारे समुद्राच्या सीमांवरही नजर ठेवता येते.

हे सुद्धा वाचा

यासोबत चार ॲस्ट्रोकास्ट, थायबोल्ट-१, थायबोल्ट-२ आणि आनंद  उपग्रह जाणार आहेत. आनंद हा खासगी कंपनी पिक्सेलचा उपग्रह आहे. अ‍ॅस्ट्रोकास्ट हा दुर्गम भागाला जोडणारा उपग्रह आहे. उपग्रह IoT सेवेसाठी हे एक लहान, परवडणारे आणि टिकाऊ तंत्रज्ञान आहे. थायबोल्ट उपग्रह भारतीय खाजगी अंतराळ कंपनी ध्रुव स्पेसने बनवला आहे. ते लोअर अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये प्रक्षेपित केले जातील.

हे आठ उपग्रह PSLV-XL रॉकेटच्या माध्यमातून लॉन्च पॅड एकवरून प्रक्षेपित करण्यात आले आहेत. या रॉकेटचे वजन 320 टन आहे. त्याची लांबी 44.4 मीटर आणि व्यास 2.8 मीटर आहे. या रॉकेटमध्ये चार टप्पे आहेत. हे रॉकेट अनेक उपग्रहांना वेगवेगळ्या कक्षेत सोडू शकते.

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.