AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ISRO : अंतराळात सुपरपॉवर बनणार भारत, साल 2030 पर्यंत अंतराळ स्थानक तयार करणार

इस्रो साल 2030 पर्यंत आपले पहिले स्पेस स्टेशन लॉंच करणार आहे. स्पेस स्टेशन म्हणजे अंतराळातील अंतराळवीरांना मुक्काम करता येण्यासारखी एक मोठी प्रयोगशाळाच असणार आहे.

ISRO : अंतराळात सुपरपॉवर बनणार भारत, साल 2030 पर्यंत अंतराळ स्थानक तयार करणार
space stationImage Credit source: socialmedia
| Updated on: Sep 11, 2023 | 8:26 PM
Share

नवी दिल्ली | 11 सप्टेंबर 2023 : चंद्रयान-3 च्या ऐतिहासिक यशानंतर भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने ( ISRO ) आपली नविन क्रांतिकारक योजना हाती घेतली आहे. भारत अंतराळात स्वत:चे स्पेस स्टेशन स्थापन करण्याची तयारी करीत आहे. अमेरिका आणि चीन यांच्या नंतर अंतराळात स्वत:चे स्पेस स्टेशन स्थापन करणारा भारत तिसरा देश ठरणार आहे. भारताचे स्पेस स्टेशन हे अमेरिका आणि चीनच्या अंतराळ स्थानकाच्या तुलनेत एकदम खास असणार आहे. साल 2030 पर्यंत भारताचे स्वत: चे अंतराळ स्थानक असणार आहे.

स्पेस स्टेशन म्हणजे काय ?

स्पेस स्टेशन म्हणजे अंतराळातील अंतराळवीरांना मुक्काम करता येण्यासारखी एक मोठी प्रयोगशाळाच असते. अंतराळात जाणारे अंतराळवीर या स्पेस स्टेशनवर जाऊन संशोधन करीत असतात. स्पेस स्टेशन पृथ्वीची प्रदक्षिणा घालत असते. अंतराळवीर स्पेस स्टेशनवर साधारण सहा महिन्यांच्या मुक्कामासाठी जातात. एका वेळी अंतराळ स्थानकात सहा ते सात अंतराळवीर रहात असतात. ते पुन्हा परतल्यानंतर दुसरी तुकडी पाठविली जाते. आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरला पंधरा देशांनी मिळून तयार केले आहे.

कसे असेल भारताचे स्पेस स्टेशन ?

इस्रोच्या शास्रज्ञांनी सांगितलेल्या माहितीनूसार भारताचे स्पेस स्टेशन 20 टन वजनाचे असेल. तर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचे वजन 450 टन आहे. तर चीनच्या स्पेस स्टेशनचे वजन 80 टन इतके आहे. इस्रोने म्हटले आहे की भारतीय स्पेस स्टेशन सेंटरमध्ये एका वेळी चार ते पाच अंतराळवीर राहू शकणार आहे. भारतीय स्पेस स्टेशनला पृथ्वीच्या सर्वात खालच्या ऑर्बिटमध्ये ठेवले जाणार आहे. या ऑर्बिटला LEO म्हटले जाते. ही कक्षा पृथ्वीपासून 400 किमी दूर असते.

गगनयान मिशन लॉंच

साल 2019 मध्ये इस्रोचे तत्कालिन प्रमुख के. सिवन यांनी मिडीयाशी बोलताना सांगितले होते की इस्रो गगनयान मोहिमेनंतर साल 2023 पर्यंत आपले स्वत:चे स्पेश स्टेशन लॉंच करेल. गगनयान मोहिमेला याची पहिली पायरी म्हटले जात आहे. इस्रो पुढच्या वर्षी मानव रहीत गगनयान मिशन लॉंच करणार आहे. जेथे गगनयान मोहिमे राबविली जाणार आहे. तेथेच इस्रो आपले स्पेस स्टेशन स्थापन करणार आहे. अलिकडेच केंद्र सरकारने इस्रोच्या या योजनेसाठी निधी दिला आहे.

नासा आणि इस्रोमध्ये करार

जी-20 परिषदमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मिडीयाशी बोलताना सांगितले की भारत आणि अमेरिका अंतराळात एकत्र भागीदारीत एकमेकांच्या योजनांना मदत करतील. इस्रोने सांगितले की अमेरिकन स्पेस एजन्सी नासा भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण देईल. यासाठी नासा आणि इस्रोमध्ये करार झाला आहे. गगनयान मोहिमेत अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांचे ह्युस्टन स्थित जॉनसन स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.

दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.