“अब अंडरग्राउंड होने का समय आ गया है” , मोदींची मिमिक्री पुलकित मणीच्या अंगाशी आली

Pulkit Mani PM Narendra Modi Rahul Gandhi: इंदुरमध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करणाऱ्या कॉमेडियन पुलकित मणीची अजून एक पोस्ट समोर आली आहे. "आता भूमिगत होण्याची वेळ आली आहे." अशी गूढ पोस्ट त्याने केली आहे.

अब अंडरग्राउंड होने का समय आ गया है , मोदींची मिमिक्री पुलकित मणीच्या अंगाशी आली
पुलकित मणी
| Updated on: Sep 20, 2026 | 2:58 PM

मध्यप्रदेशातील इंदुरमध्ये छात्रो की गुंज हा कार्यक्रम भलत्याच कारणासाठी गाजला. या मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करण्यात आली. स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणी याने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या समोरच मोदींची मिमिक्री आणि अंग विक्षेप केला. विशेष म्हणजे काँग्रेसने एक्स हँडलवर याविषयीचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला. त्यावर भाजप नेते तुटून पडले. त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र डागले. अनेकांनी सणसणीत, खणखणीत आणि शेलकी टीका केली. तर आता कॉमेडियन पुलकित मणीची अजून एक पोस्ट समोर आली आहे. “आता भूमिगत होण्याची वेळ आली आहे.” अशी गूढ पोस्ट त्याने केली आहे.

आता भूमिगत होण्याची वेळ आली आहे

स्टँड-अप कॉमेडियन पुलकित मणी यांचा नोएडामधील शो अचानक रद्द झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर “अब अंडरग्राउंड होने का समय आ गया है” (आता भूमिगत होण्याची वेळ आली आहे) अशी पोस्ट शेअर केली आहे. राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमादरम्यान पुलकित मणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केलेली मिमिक्री आणि सादरीकरण यावरून राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला होता मिमिक्रीच्या वादानंतर पुलकित मणी यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रॉलिंग आणि विरोधाचा सामना करावा लागत आहे. याच दबावातून नोएडातील त्यांचा नियोजित शो रद्द करण्यात आल्याचे मानले जात आहे.

गुन्हा दाखल होणार?

तर मिमिक्रीच्या नावाखाली थेट पंतप्रधानांचा अवमान, अपमान करण्याचा हा प्रयत्न असल्याने भाजप कार्यकर्ते संतापले आहे. विधायक टीका समजू शकतो, पण अशा खालच्या स्तरावरील टीका योग्य नसल्याचा सूर आळवला जात आहे. एका घटनात्मक, संवैधानिक पदावरील व्यक्तीची अशी नक्कल करणे योग्य नसल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी आता भाजप काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंदुरमध्ये काँग्रेसने छात्रो की गुंज हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात हा प्रकार घडला. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर मोठी टीका केली.


भाजपमधून जोरदार हल्लाबोल

या प्रकारानंतर भाजपमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक मंत्री आणि बड्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष विनोदी आणि नक्कलाकारांचा पक्षू करून टाकल्याची टीका केली. त्यांनी अशा गोष्टी शोभत नसल्याचे म्हटले आहे. असेच राहिले तर काँग्रेस पक्ष प्रवाह पतीत होण्याचे वक्तव्यही त्यांनी केले. माजी मंत्री स्मृती इराणी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या कार्यक्रमातील या मिमिक्रीवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us