AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jagannath Temple: ४८ वर्षानंतर उघडला जगन्नाथ मंदिराचा खजाना, रहस्यमय आवाज आणि सोने-चांदीने भरलेले गुप्त चेंबर्स

जगन्नाथ मंदिरातील खजान्याला ४८ वर्षांत पहिल्यांदा उघडण्यात आले आहे. यातील सोने- चांदी आणि हिरे तसेच मुल्यवान रत्नांची मोजणी केली जात आहे. या मंदिर परिसरात अनेक गुप्त चेंबर असल्याचा दावा केला जात आहे.यात मोठा खजाना असल्याचा दावा केला जात आहे.

Jagannath Temple: ४८ वर्षानंतर उघडला जगन्नाथ मंदिराचा खजाना, रहस्यमय आवाज आणि सोने-चांदीने भरलेले गुप्त चेंबर्स
Jagannath Temple
| Updated on: Apr 14, 2026 | 8:10 PM
Share

ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरातील खजाना ४८ वर्षांनंतर उघडण्यात आला आहे. या देवाच्या या रत्न भांडारात बहुमुल्या दागिन्यांची गिनती करण्याचे काम केले जात आहे. असे म्हटले जाते की या खजान्यात सोने आणि चांदी, हिरे-मोती यांचा अक्षरश: खच आहे. मंदिराच्या प्रांगणात आज देखील असे अनेक गुप्त चेंबर आहेत, ज्यात खजाना असल्याचा दावा केला जातो. तसेच मंदिरात एक गुप्त भुयार असल्याचा दावा पुजाऱ्यांच्या वंशजांनी केलेला आहे. चला तर पाहूयात या भुयाराचे राज काय आहे ? येथे कोणत्या खजाना असल्याचा दावा केला जात आहे आणि तो शेकडो वर्षे कसा सुरक्षित आहे.

मंदिराचे पुजारी सांगतात की जगन्नात मंदिरातील खजान्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने-चांदी आणि बहुमुल्य रत्ने होती की दर शंभर वर्षांनी एकदा होणाऱ्या रघुनाथ शृंगारात संपूर्ण चित्ररथ सोने आणि रत्नांनी भरुन जायचा. त्यामुळे या सोने आणि रत्नांच्या आकर्षणामुळे परदेशी आक्रमकांचे लक्ष वारंवार पुरीकडे वेधले जायचे.

देशातील सर्वात श्रीमंत मंदिर असल्याचा दावा

इतिहासात उल्लेख आहे की ज्या प्रकारे सोमनाथ मंदिराला परदेशी आक्रमकांनी १७ वेळा लुटले होते. त्याच प्रकारे जगन्नाथ मंदिर लुटण्याचा देखील १८ वेळा प्रयत्न केला होता. प्रत्येक वेळी मंदिराच्या रक्षकांनी ठाकूरजींच्या मूर्तीचे त्या आक्रमकांपासून रक्षण केले होते.जेव्हा जेव्हा आक्रमण व्हायचे होते तेव्हा रक्षक मूर्तीला त्यांचे पूर्वज मंदिरातील गुप्त भुयारात घेऊन जायचे. असे म्हणतात त्या भुयारात आजही मोठा खजाना लपवलेला आहे.

जगन्नाथ मंदिराचे पुजारी पंडित सोमनाथ यांनी सांगितले की या मंदिरावर १८ वेळा आक्रमण झाले आणि हे भारताचे सर्वात मोठे आणि श्रीमंत मंदिर आहे.

जगन्नाथ मंदिराच्या देवाच्या या मूर्तींना दर १२ वर्षांनी एकदा बदलण्याची परंपरा आहे. जेव्हा मूर्ती बदलली जायची तेव्हा मंदिराला बंद केले जायचे. शहरातील वीज बंद केली जायची. पुजाऱ्याच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधून हे काम केले जायचे. त्यावेळी रत्न भंडारातून अनेक रहस्यमय आवाज ऐकू यायचे असे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे.

रत्न भंडारातून रहस्यमय आवाज

पुजारी बासुदेव म्हणतात की आम्ही या संदर्भात अनेक कहाण्या ऐकायला मिळायचे. या मंदिरात सांपाचे फुत्कार देखील ऐकू यायचे. तेथे एक अन्न भरलेला हंडा देखील ठेवला जायचा.या हंड्यातील अन्न कोण खायचं हे आजपर्यंत कळालेले नाही.आम्ही लोक रत्न भंडारसमोर १५ दिवस काम करायचो.जेव्हा जगन्नाथ जी यांची वीज कापली जायची. दाट काळोख असायचा. जेव्हा खूप सारे आवाज ऐकायला यायचे.

भगवान जगन्नाथ यांचे सध्याचे मंदिर सातव्या शतकाचे म्हटले जाते. शतकांपासून या दिव्य मंदिराचे स्वत:चे कठोर व्यवस्थापन आहे. परंपरा आहेत आणि त्याहून अधिक रहस्य आहेत. जे उर्वरित जगासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिले आहेत. परंतू जगभरातील भक्त संपूर्ण आस्थेसोबत मंदिराशी संबंधित परंपरा आणि रहस्यांचा सन्मान करत आले आहेत.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?