AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंना दुसरं काम काय ? संजय राऊतांचा खोचक सवाल

संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंतप्रधान मोदी भेटीवर सडकून टीका केली आहे. "शिंदेंना दुसरं काम काय?" असा खोचक सवाल राऊतांनी विचारला. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना, शिंदे गटाला मोदी-शहांची 'सिस्टर कंपनी' संबोधत राऊतांनी त्यांना हिशोब द्यायला जावं लागतंय, अशी टोलेबाजी केली. विद्यार्थी भेटीच्या मुद्द्यावरही त्यांनी शिंदेंना राजकीय अपरिपक्व ठरवले.

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंना दुसरं काम काय ? संजय राऊतांचा खोचक सवाल
संजय राऊतांनी शिंदेंना सुनवालं
| Updated on: Aug 08, 2026 | 11:16 AM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. त्यांची जवळपास तासभर चर्चा झाली . शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच शिंदेंनी मोदींची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आलं. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) हे रुचलं नसून त्यांनी शिंदेंवर थेट निशाणा साधत टीकास्त्र सोडलं. शिंदेंना दुसरं काम काय ? ते दिवसभर त्यांच्या बेडरुममध्येही बसतील, असं म्हणत राऊतांनी मोदी- शिंदे भेटीवर टीका केली.

एकनाथ शिंदेंना काम काय आहे ? ते त्यांच्या बेडरूममध्येही दिवसभर बसतील, दुसरं काम काय ? सुप्रीम कोर्टात ( शिवसेना पक्ष आणि चिन्ह) सुनावणी सुरू आ हे, त्यामुळे ते तंग आहेत. झोप लागत नाही त्यांना. ते ( नरेंद्र मोदी) त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ना. शिंदे गट म्हणजे मोदी-शहांची सिस्टर कंपनी आहे. जावं लागतं हिशोब द्यायला, असं राऊतांनी सुनावलं.

तुम्ही गद्दारांना भेटता, आम्ही विद्यार्थ्यांना भेटू नये ?

जंतरमंतरवरंच आंदोलन संपलं, विद्यार्थी आपापल्या कामाला लागले, पण विरोधी पक्ष यावरून अजूनही राजकारण करत असल्याचं एकनाथ शिंदे नुकतेच म्हणाले होते. त्यावरूनही राऊतांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. ‘हो, आम्ही राजकारण करतोय. मग काय म्हणणं आहे ? तुम्ही जर गद्दारांना भेटत असाल राजकारण करण्यासाठी, तर आम्ही विद्यार्थ्यांना भेटू नये ? असा सवाल त्यांनी विचारला. तुम्ही तृणमूल, शिवसेना, आप यांना सोडून गेलेल्यांना, गुन्हेगारांना, घटनात्मक दृष्ट्या जे गुन्हेगार आहेत त्यांना भेटताय. त्यांच्या तोंडात जिलबी आणि फाफडा भरवताय, फोटो आलेत बाहेर. तुम्ही राजकारण करताय, मग आम्ही काय गोट्या खेळायच्या ? शिंदेंना सांगा लहान आहात राजकारणात तुम्ही अजून’ अशा शब्दांत राऊतांनी घणाघाती टीका केली.

अभिजीत दीपकेंनाही दिला सल्ला

अभिजीत दीपके यांनी काल पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. त्यांची हेरगिरी सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला. त्यावर राऊतांनी स्पष्ट उत्तर दिलं. अभिजीत दीपके हे आता ज्या आंदोलनातून पुढे आले आहेत, या देशातली एक सिस्टीम, अशा प्रकारची पाळत सर्वांवर ठेवली जाते.  हे होत असतं, या गोष्टी राजकारणात सहन करायच्या असतात. आपल्यावरती कोणी पाळत ठेवली म्हणून काम थांबतं का, तर तसं अजिबात नाही. अभिजीत दीपके हळूहळू परिपक्व होतील आणि चांगलं काम करतील. आपण सरकारशी संघर्ष करायला उभे राहिलो आहोत, त्यामुळे सरकार पावला-पावलावर आपल्याला विरोध करेल, अडथळे निर्माण करेल.  सरकार आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करेल, या गोष्टी आपल्याला लढताना नेहमी सहन कराव्या लागतात, तरच आपण जमिनीवर टिकू शकतो, हा माझ्या दीपकेंना प्रेमाचा सल्ला आहे, असं राऊत म्हणाले.

Follow Us
मोठी बातमी! एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला
मोठी बातमी! एकनाथ शिंदे पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला, राजकीय हालचाली वाढल्या
पोलिसांशी पंगा भोवला! अभिजीत दीपकेंचं पोलीस संरक्षण जाणार?
Abhijeet Dipke | पोलिसांशी पंगा भोवला! अभिजीत दीपकेंचं पोलीस संरक्षण जाणार?; नेमकी काय आहे मागणी?
वारंवार फुटीर खासदार पंतप्रधानांच्या भेटला का जातात? कोर्टातील सुनावणी
वारंवार फुटीर खासदार पंतप्रधानांच्या भेटला का जातात? कोर्टातील सुनावणींचा उल्लेख करत संजय राऊतांनी सांगितलं गुपित
पुण्यानंतर आता अमित शाह मुंबईत! राजकीय घडामोडींना वेग
Amit Shah Mumbai Visit | पुण्यानंतर आता अमित शाह मुंबईत! राजकीय आढाव्यासह दोन महत्त्वाचे कार्यक्रम, राजकीय घडामोडींना वेग
मोबाईल घेतलाय EMI वर? हप्ता थकवला तर सावधान! RBI च्या नव्या नियमाने...
मोठी बातमी! मोबाईल घेतलाय EMI वर? हप्ता थकवला तर सावधान! RBI च्या नव्या नियमाने वाढली चिंता, नेमकं काय होणार?
मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले...
Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त...
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!
मोदींच्या भेटीनंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं?
Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख....
CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतचा अचानक यू-टर्न! म्हणाल्या...
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या...