‘आयआयटी’वाल्या बाबांचं मोठं कांड, गांजाच्या नशेत बोलले असे काही, पोलिसांची उडाली धावपळ
आयआयटी बाबा नावानं प्रसिद्ध असलेल्या अभय सिंह यांनी सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिली होती. त्यानंतर आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सोशल मीडियावर आयआयटी बाबा नावानं प्रसिद्ध असलेल्या अभय सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अभय सिंह यांनी सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिली होती. त्यानंतर या घटनेची चौकशी करण्यासठी जयपूर पोलीस अभय सिंह राहत असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचले.पोलिसांनी या प्रकरणात त्यांची चौकशी केली.चौकशीदरम्यान आयआयटी बाबांनी धक्कादायक खुलासा केला आहे.पोलिसांनी जेव्हा या धमकी प्रकरणात त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की तेव्हा मी गांजाच्या नशेत होतो.
नेमकं काय म्हणाले अभयसिंह?
जेव्हा पोलिसांनी अभय सिंह यांची चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी गाजांच्या नशेमध्ये होतो. मी नशेत काय बोललो हे मला आता आठवत नाही. अभयसिंह यांनी यावेळी आपल्याजवळ असलेली गांजाची पुडी देखील पोलिसांना दाखवली.पोलिसांकडून ही गांजाची पुडी जप्त करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांनी NDPS कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अभय सिंह हे हॉटेल पार्क क्लासिकमध्ये असून ते आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं संबंधित हॉटेलमध्ये पोहोचले. या प्रकरणात बाबांची चौकशी करण्यात आली, तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितलं की मी हे जे काही करत होतो, तेव्हा मी गांजाच्या नशेमध्ये होतो. त्यामुळे मी काय करत होतो हे मला माहीत नाही.त्यानंतर आयआयटी बाबानं आपल्या जवळ असलेला गांजा देखील पोलिसांना दिला.पोलिसांनी हा गांजा जप्त केला आहे, तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान हा गांजा थोडाच म्हणजे 1.50 ग्रॅम इतकाच होता, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात गांजा जप्त करून NDPS कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, आयआयटी बाबांना समज देऊन सोडण्यात आलं आहे.
दरम्यान याच आयआयटी बाबांनी चॅम्पयिन्स ट्रॉफीमध्ये खेळवण्यात आलेल्या पाकिस्तान आणि भारत सामन्यापूर्वी मोठी भविष्यवाणी केली होती. हा सामना पाकिस्तानच जिंकणार असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांचं हे भाकीत खोट ठरलं, हा सामना भारतानं जिंकला.
