पाकिस्तानचे 10-12 जवान टिपले, भारतीय जवानांची धडाकेबाज कारवाई

पाकिस्तानकडून भारताच्या दिशेला अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात काही सर्वसामान्य नागरिकांचादेखील मृत्यू झाला आहे (Jammu and Kashmir Pakistan violets ceasefire in many places).

पाकिस्तानचे 10-12 जवान टिपले, भारतीय जवानांची धडाकेबाज कारवाई

श्रीनगर : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानी सैन्याने सीमारेषेवर बारामुल्ला, गुरेज, उरी, कुपवाडा या चार भागात बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानी सैनिकांकडून आज (13 नोव्हेंबर) दुपारी एक वाजेच्या सुमारास भारताच्या दिशेला अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात काही सर्वसामान्य नागरिकांचादेखील मृत्यू झाला आहे (Jammu and Kashmir Pakistan violets ceasefire in many places).

पाकिस्तानाकडून करण्यात आलेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं.  भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या 10 ते 12 सैनिकांचा खात्मा केला. पण या चकमकीत भारताचेदेखील तीन जवान शहीद झाले आहेत. याशिवाय एक भारतीय जवान गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या जवानाचं नाव वासु राजा असं आहे. या जवानावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत (Jammu and Kashmir Pakistan violets ceasefire in many places).

पाकिस्तानकडून बारामुल्ला जिल्ह्यातील हाजीपीर भागात गोळीबार करण्यात आला. त्याचबरोबर तंगदार आणि गुरेज सेक्टर भागातही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.

पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबारात सीमाजवळील एका घराचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर एक महिलादेखील जखमी झाली आहे. गोळीबारानंतर सीमाभागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं. दरम्यान, या गोळीबारात उरी सेक्टर भागात तीन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत.

सीमाभागात भारतीय जवानांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे अतिरेक्यांना घुसखोरी करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन भारताच्या दिशेला गोळीबार केला तर भारतीय जवान गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यात गुंततील आणि अतिरेकी भारतात शिरतील, असा नापाक इरादा पाकिस्तानचा आहे. मात्र,  भारतीय जवान गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना जागेवर ठेचत आहेत.

पाकिस्तानकडून आज करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी तोडीस तोड उत्तर दिलं आहे. भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याच्या 10 ते 12 जवानांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये पाकिस्तानी सैन्यातील 2 ते 3 ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

गेल्या आठवड्यात 7 आणि 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्री काही अतिरेक्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैनिकांनी त्यांना घुसखोरी करण्यापासून अडवलं. घुसखोर अतिरेकी आणि सैनिक यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं. मात्र, या चकमकीत चार जवान शहीद झाले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI