Ananatnag Encounter | हौतात्म्याचा बदला, घनदाट जंगलात स्पेशल फोर्सेसकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Ananatnag Encounter | उरीच्या जंगलात सैन्याच मोठं ऑपरेशन सुरु आहे. स्पेशल फोर्सेसची पॅरा कमांडोजची टीम मैदानात उतरली आहे. दहशतवाद्यांना पळण्यासाठी जागाच ठेवलेली नाही. चहूबाजूंनी घेराबंदी केली आहे.

अनंतनाग : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सैन्याच सर्च ऑपरेशन सुरु आहे. बारामुल्लाहमधून एक मोठी बातमी समोर आलीय. सैन्याने एन्काऊंटर सुरु असताना दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. उरीच्या हथलंगा भागात सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. अनंतनागच्या जंगलात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीचा आज चौथा दिवस आहे. दोन ते तीन लश्कर-ए-तैयबाचे दहशतवादी डोंगराळ भागात लपले असण्याची शक्यता आहे. कमांड कंट्रोल वाहन हायटेक सीसीटीव्ही आणि 360 डिग्री कॅमेऱ्याद्वारे दहशतवाद्यांवर लक्ष ठेवलं जातय. ड्रोनद्वारे जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. भारतीय सैन्याच दहशतवादविरोधी ऑपरेशन युनिट, जम्मू-काश्मीर पोलीस स्पेशल टीम आणि पॅरा कमांडोज या ऑपरेशनमध्ये आहेत. लपलेल्या दहशतवाद्यांना पळता येऊ नये, यासाठी घेराबंदी करण्यात आली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्थानिक मीडियाशी बोलताना एका दहशतवाद्याला संपवल्याची माहिती दिली. या दहशतवाद्यांची ओळख अजून पटलेली नाही. दुसऱ्या दहशतवाद्याचा शोध सुरु होता. त्यालाही संपवण्यात आलय. पोलीस आणि सैन्याच्या संयुक्त टीमने परिसरात घेराबंदी करुन शोध मोहिम सुरु केली होती. सुरक्षा पथकांची संयुक्त टीम संशयित स्थानावर पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी संयुक्त टीमवर गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरात सैन्याच्या जवानांनी गोळीबार केला. अखेरीस सैन्याने दोन्ही दहशतवाद्यांना घेरलं व त्यांना संपवलं.
#WATCH | J&K: Encounter broke out between terrorists and Army & Baramulla Police in the forward area of Uri, Hathlanga in Baramulla district. Two terrorists were killed in the encounter.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/0cRpZJDY8Q
— ANI (@ANI) September 16, 2023
रॉकेट लॉन्चरचा वापर
अनंतनागमध्ये सुरु असलेल्या एन्काऊंटरचा आज चौथा दिवस आहे. भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सैन्याने ड्रोनच्या मदतीने दहशतवादी ठिकाणांवर बॉ़म्बफेक केली. हल्ल्यानंतर दहशवादी पळताना दिसले. त्याशिवाय रॉकेट लॉन्चरच्या मदतीने दहशतवादी ठिकाणांवर फायरिंग करण्यात आली. अधिकृत माहितीनुसार, आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना संपवण्यात आलय.
