Pulwama Encounter: पुलवामात सुरक्षा दलाला मोठं यश, लश्कराचा पाकिस्तानी कमांडर एजाज ऊर्फ अबु हुरैरासह तीन अतिरेकी ठार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 14, 2021 | 1:38 PM

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज अतिरेकी आणि सुरक्षा दला दरम्यान मोठी चकमक उडाली. या चकमकीत सुरक्षा दलाने लश्कर ए तोयबाच्या तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं. (Jammu kashmir encounter)

Pulwama Encounter: पुलवामात सुरक्षा दलाला मोठं यश, लश्कराचा पाकिस्तानी कमांडर एजाज ऊर्फ अबु हुरैरासह तीन अतिरेकी ठार
Jammu kashmir encounter
Follow us

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज अतिरेकी आणि सुरक्षा दला दरम्यान मोठी चकमक उडाली. या चकमकीत सुरक्षा दलाने लश्कर ए तोयबाच्या तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं. या चकमकीत लश्करचा पाकिस्तानातील कमांडर एजाज ऊर्फ अबु हुरैराचाही खात्मा करण्यात आला आहे. या अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणवार शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. (Jammu kashmir encounter: encounter between security forces and terrorists in pulwama)

काश्मीर पोलिसांना काही अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या टीमने संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं. यावेळी अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनीही बचावासाठी गोळीबार केला. या चकमकीत अतिरेकी ठार झाले.

कुलगाममध्ये आयईडी निष्क्रिय

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात अतिरेक्यांनी एका झाडाखाली आयईडी लपवले होते. सुरक्षा दलाने हे आयईडी निष्क्रिय केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. काजीगुंड परिसरात दामेजन गावाच्या बाहेरच्या परिसरात झाडाखाली आयईडी लपवण्यात आले होते. सुरक्षा दल आणि केंद्रीय राखवी दलाच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन घेराबंदी केली. घटनास्थळी बॉम्ब निरोधक पथकालाही पाचारण करण्यात आलं. त्यानंतर आयईडी निष्क्रिय करून तिथेच नष्ट करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं पोलिसांच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं.

8 जुलै रोजी दोन अतिरेक्यांना कंठस्नान

या आधी 8 जुलै रोजी पुलवामामध्ये सुरक्षा दलाने दोन अतिरेक्यांना ठार केलं. हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानी याला ठार करून पाच वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात काही भाग बंद ठेवण्यात आले होते. त्याच दिवशी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक उडाली होती. यावेळी सुरक्षा दलाने दोन अतिरेक्यांना ठार केलं. हे दोन्ही अतिरेकी लश्कर ए तोयबाचे असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Jammu kashmir encounter: encounter between security forces and terrorists in pulwama)

संबंधित बातम्या:

VIDEO: तुम्ही खरच एकटं लढणार आहात का?…तसं स्पष्ट सांगा; पवारांची काँग्रेस नेत्यांना विचारणा

‘या’ राज्यात उभारले जाणार देशातील सर्वात मोठं सोलर पार्क, काय होणार फायदा?

Zomato चा आयपीओ आज बाजारपेठेत, किती शेअर्स विकत घेऊ शकता, किंमत किती?

(Jammu kashmir encounter: encounter between security forces and terrorists in pulwama)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI