Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये 8 तासात दुसरा दहशतवादी हल्ला, आता नेमका कुठे झाला गोळीबार?

या दहशतवादी हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला, त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसराची नाकाबंदी करण्यात आली. इतर या परिसरात पोलिसांची शोधमोहीमही सुरू आहे.

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये 8 तासात दुसरा दहशतवादी हल्ला, आता नेमका कुठे झाला गोळीबार?
Agniveer RecruitmentImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 4:39 PM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) अनंतनागमधील बिजबेहारा पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी दुपारी पोलीस आणि सीआरपीएफ (CRPF) टीमवर दहशतवाद्यांकडून गोळीबार (Terrorist Firing) करण्यात आला. ज्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांतील ही दुसरी दहशतवादी घटना आहे. काश्मीर पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. पोलिसांनी ट्विट केले की, “अनंतनागच्या बिजबेहारा भागात दहशतवाद्यांनी पोलिस/सीआरपीएफ जॉइंट नाका पार्टीवर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला, त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसराची नाकाबंदी करण्यात आली. इतर या परिसरात पोलिसांची शोधमोहीमही सुरू आहे.

जम्मू काश्मीर पोलिसांचं ट्विट

पोलीस ठाण्याचे प्रमुख जखमी

मिळालेल्या माहितीनुसार बिजबेहारा येथील कुरकडल येथे कर्तव्य बजावत असलेल्या बिजबेहारामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात बिजबेहारा पोलीस ठाण्याचे प्रमुख जखमी झाले आहेत. त्यांना एसडीएच बिजबेहरा येथे हलवण्यात आले आहे.

बिहारमधील मजुराचीही हत्या

या खोऱ्यात सातत्याने टार्गेट किलिंग होत आहे. बिहारमधील बांदीपोरा येथील अजस तहसीलच्या सदुनारा गावात शुक्रवारी पहाटे एका स्थलांतरित मजुराची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. मोहम्मद अमरेज असे मृताचे नाव असून तो मोहम्मद जलीलचा मुलगा असून तो बिहारचा रहिवासी आहे. अशी 10 महिन्यांत 7 जणांची हत्या करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसात टार्गेट किलिंग वाढल्या

विशेष म्हणजे काश्‍मीर खोर्‍यात होत असलेल्या टार्गेट किलिंगमुळे सरकारी कर्मचारी आणि स्थलांतरित मजूर दहशतीत दिसत आहेत. टीव्ही कलाकार, बँक मॅनेजर यांनाही येथे दहशतवाद्यांकडून टार्गेट केले जात आहे. गेल्या काही महिन्यांतील अशा सततच्या घटनांमुळे चिंता वाढली होती. त्यानंतर 26 दिवसांत टार्गेट किलिंगच्या 10 घटना उघडकीस आल्यानंतर आता तेथून पलायनही सुरू झाले होते. सध्या या घटना थांबवण्याचं आव्हान हे सध्या सुरक्षा दलांसमोर उभं राहिलं आहे.

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.