AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Advanced 2020 Results | JEE Advance परीक्षेचा निकाल जाहीर, 43 हजार विद्यार्थी उत्तीर्ण

JEE Advance 2020 चा निकाल नुकतंच जाहीर करण्यात आला  आहे. (JEE Advanced 2020 Results Live Update)

JEE Advanced 2020 Results | JEE Advance परीक्षेचा निकाल जाहीर, 43 हजार विद्यार्थी उत्तीर्ण
| Updated on: Oct 05, 2020 | 12:00 PM
Share

नवी दिल्ली : JEE Advance 2020 चा निकाल नुकतंच जाहीर करण्यात आला  आहे. जवळपास 1 लाख 50 हजार 838 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यातील पेपर 1 आणि 2 मध्ये जवळपास 43 हजार 204 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात 6 हजार 707 विद्यार्थिनी आहेत. (JEE Advanced 2020 Results Live Update)

IIT मुंबई झोनमधून चिराग फालोर याने सामान्य श्रेणी यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याला 396 पैकी 352 गुण मिळाले आहेत. तर कनिष्का मित्तल या विद्यार्थिनीेने सामान्य श्रेणी यादीत 17 वा तर महिलांच्या यादीत पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तिला 396 पैका 315 गुण मिळाले आहेत.

यंदा निकाल जाहीर करतेवेळी HSC परीक्षेतील गुणांचा विचार करण्यात आलेला नाही. नव्या नियमानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी जेईई अॅडवान्स ही परीक्षा देण्यासाठी बारावीच्या परीक्षेत 75 टक्के गुण असणे अनिवार्य होते. मात्र यंदा कोरोनामुळे CBSE आणि CISCE यासह कित्येक बोर्डाने काही विशेष आधारावर बारावीचे निकाल जाहीर केले आहेत. JEE Advance ही परीक्षा 27 सप्टेंबरला जाहीर केली होती.

विद्यार्थ्यांना JoSSA काऊन्सिलिंगमध्ये सहभागी होण्यासाठी जेईई अॅडव्हान्स्ड निकाल डाऊनलोड करावा लागणार आहे. जे विद्यार्थी JEE Advance या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, ते आयआयटी, एनआयटी आणि अन्य संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरणार आहेत.

असा चेक करा JEE Advanced results 2020:

– jeeadv.ac.in या वेबसाईटवर जा

– होम पेजवर देण्यात आलेल्या JEE Advanced result 2020 link वर क्लिक करा

– स्क्रिनवर एक नवीन पेज ओपन होईल

– त्यात डिटेल्स भरुन लॉग इन करा

– JEE Advanced result स्क्रिनवर दिसेल

– रिझल्ट डाऊनलोड करुन सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआऊटही काढा. (JEE Advanced 2020 Results Live Update)

संबंधित बातम्या : 

बीएमसीच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी व्हा, सिनेकलाकार, साहित्यिकांचं आवाहन

आता सुशांतप्रकरणाचा अहवाल अंध भक्त नाकारणार काय?, शिवसेनेचा सवाल

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.