आधी तरुणीला आता तरुणाला पेटवलं; जिवंत जाळण्याच्या घटना ‘या’ राज्यात थांबता थांबेनात

झारखंडची उपराजधानी दुमकामधील गढवा जिल्ह्यातील बंशीधरनगरमधील युवकाला एका विशिष्ट समाजाच्या गटाकडून पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आलेल्या युवकाचे नाव दीपक सोनी असून त्याला गंभीर अवस्थेतच रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

आधी तरुणीला आता तरुणाला पेटवलं; जिवंत जाळण्याच्या घटना 'या' राज्यात थांबता थांबेनात
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 11:36 AM

रांचीः झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील (Jharkhand garhwa) एका विशिष्ट समाजाकडून दीपक सोनी नावाच्या तरुणाला पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. युवकावर पेट्रोल टाकून पेटवून (Petrol set the youth on fire)  दिल्यानंतर तो गंभीररित्या जखमी झाल्याचे सांगण्यात आले. ही घटना समजताच पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे. झारखंडची उपराजधानी दुमकामधील गढवा जिल्ह्यातील बंशीधरनगरमधील युवकाला एका विशिष्ट समाजाच्या गटाकडून पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आलेल्या युवकाचे नाव दीपक सोनी असून त्याला गंभीर अवस्थेतच रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

या घटनेनंतर भाजपकडून झारखंडमधील सोरेन सरकारला धारेवर धरण्यात आले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे.

सोरेन सरकारवर भाजपची आगपाखड

भाजपकडून टीका करताना म्हणाले आहे की, कसमुद्दीनने दीपकला पेटवून दिले आहे तर शाहरुखने अंकिताला पेटवले आहे, तर या आधी दुमकामध्ये एका युवतीला मुस्लिम युवकाने पेट्रोल टाकून जिवंत पेटवून दिले होते. तर त्याच परिसरात एका आदिवासी मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती.

चेहरा जळाला

पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आलेला युवक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले गेले आहे. त्याचा चेहराही जळाला असून या घटनेमागील कारण अजून स्पष्ट झाले नाही. मात्र पोलिसांनी चौकशी केली असून काही जणांना ताब्यात घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पोलिसांकडून छापेमारी

एका विशिष्ट समाजाकडून युवकाला पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आल्यानंतर पोलिसांनी छापेमारी करत अनेक जणांना ताब्यात घेत आहेत. आरोपी आणि जखमी युवक एकाच गावातील असून या घटनेमागेच नेमके कारण अजून समजू शकले नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.