JNU राडा : 9 संशयितांची रेखाचित्रे जारी, विद्यार्थी संघटनेच्या आइशी घोषचंही नाव

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयूतील राड्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी संशयितांची रेखाचित्रे जारी (Aishe Ghosh JNU violence suspects images) केली आहे.

, JNU राडा : 9 संशयितांची रेखाचित्रे जारी, विद्यार्थी संघटनेच्या आइशी घोषचंही नाव

नवी दिल्ली :  दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयूतील राड्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी संशयितांची रेखाचित्रे जारी (Aishe Ghosh JNU violence suspects images) केली आहे. संशयित आरोपींमध्ये 9 जणांचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे जेएनयू राड्यानंतर रक्तबंबाळ फोटो समोर आलेल्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोषचंही (Aishe Ghosh JNU violence suspects images) नाव आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने पत्रकार परिषद घेऊन संशयितांची ओळख पटल्याचं म्हटलं आहे.

या 9 जणांमध्ये  चुनचुन कुमार, पंकज मिश्रा, योगेंद्र भारद्वाज, प्रिया रंजन, विकास पटेल, डोलन आणि आइशी घोष यांचा समावेश आहे. जेएनयूमध्ये पाच जानेवारीला तुफान राडा झाला होता. तोंड बांधून आलेल्या हल्लेखोरांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना लोखंडी सळईने मारहाण केली होती.

दरम्यान, दिल्ली पोलिसातील अधिकारी जॉय तिरकी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती दिली. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो, व्हिडीओच्या मदतीने 9 विद्यार्थ्यांची ओळख पटली असून, त्यांना लवकरच नोटीस पाठवण्यात येईल, असं तिरकी यांनी सांगितलं.

यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोष, जेएनयू विद्यार्थी संघटनेची सुचेता ताल्लुकदार, चुनचुन कुमार, प्रिया रंजन, डोलन सामंत, योगेंद्र भारद्वाज, विकास पटेल, पंकज मिश्रा आणि वास्कर विजय यांचा समावेश आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

आइशी घोषचा सवाल

दरम्यान, पोलिसांनी संशयित म्हटल्याने कोणी संशयित ठरत नाही, असं आइशी घोषने म्हटलं. माझा देशाच्या न्याय पालिकेवर विश्वास आहे. मला आशा आहे की खऱ्या आरोपींचा चेहरा समोर येईल, असं आइशीने नमूद केलं.

स्मृती इराणींचं ट्विट

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *