CJP Protest : हे तर अँटीनॅशनल, कंगना राणौत यांची CJP आंदोलकांवर टीका, म्हणाल्या, देशाचे तुकडे….
देशद्रोही आणि दहशतवादी तसेच आंतरराष्ट्रीय शक्ती आपल्या देशासाठी गंभीर समस्या बनल्या आहेत. काहीही कारण देऊन देशाला तसेच देशातील नागरिकांना त्रास देण्याचा कट रचला जातोय, असा आरोप कंगना राणौत यांनी केला.

Kangana Ranaut on CJP Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीने आक्रमक पवित्रा धारण केलाय. काहीही झालं तरी आम्ही दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करणार. जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी सीजेपीची भूमिका आहे. सीजेपीने आंदोलन करू नये यासाठी दिल्लीत हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. आंदोलक जंतर-मंतरवर जाण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यांना ताब्यात घेतलं जातंय. आंदोलनाचे हे लोन देशभरात पसरले आहे. मुंबईतही शिवाजी पार्क मैदानात आंदोलक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, सीजेपीच्या या आंदोलनावर भाजपाच्या खासदार तथा अभिनेत्या कंगना राणौत यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी आंदोलकांना देशद्रोही म्हटलंय.
काय म्हणाल्या कंगना रणौत?
ज्ञानेश कुमार यांच्याबाबत केल्या जाणाऱ्या मागणीला राणौत यांनी विरोध केलाय. तसेच हे आंदोलक म्हणजे देशविरोधी शक्ती आहेत, असंही त्या म्हणाल्या. या आंदोलनाच्या माध्यमातून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय. लोकांना या आंदोलनाचा उद्देश समजला आहे. लोक आता प्रश्न विचारायला लागले आहेत, असाही दावाही त्यांनी केला.
सीजेपी तर अँटीनॅशनल
देशद्रोही आणि दहशतवादी तसेच आंतरराष्ट्रीय शक्ती आपल्या देशासाठी गंभीर समस्या बनल्या आहेत. काहीही कारण देऊन देशाला तसेच देशातील नागरिकांना त्रास देण्याचा कट रचला जातोय. मी आता अयोध्येत प्रभू श्रीराम यांचे दर्शन घ्यायला जात आहे. जोपर्यंत प्रभू श्रीराम आणि भगवान हनुमान यांचा आमच्या डोक्यावर आशीर्वाद आहे, तोपर्यंत कोणीही काहीच करू शकत नाही, असं राणौत म्हणाल्या. तसेच, भारताला तोडण्यासाठी अनेक शक्ती काम करत आहेत. परंतु भारतातील नागरिक हे एकजुटीने उभे आहेत. सगळे एकजूट आहेत, असा विश्वासही कंगना राणौत यांनी व्यक्त केला.
