AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘निर्लज्ज सत्तेला विचारा किती मंत्र्यांचे मुलं सैन्यात’, नक्षलवादी हल्ल्याच्या ट्विटवरुन कन्हैय्या कुमार ट्रोल

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते (CPI) कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांनी छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सलाम करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधलाय.

'निर्लज्ज सत्तेला विचारा किती मंत्र्यांचे मुलं सैन्यात', नक्षलवादी हल्ल्याच्या ट्विटवरुन कन्हैय्या कुमार ट्रोल
| Updated on: Apr 05, 2021 | 9:46 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते (CPI) कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांनी छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सलाम करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधलाय. “एकीकडे शेतकरी बापाची मुलंच सैनिक आहेत, तर दुसरीकडे देशात बाप गृहमंत्री आणि मुलगा बीसीसीआयचा सचिव आहे. किती मंत्र्यांची मुलं सैन्यात आहे हा प्रश्न सत्तेला विचारा,” असं मत कन्हैय्या कुमार यांनी व्यक्त केलं. या ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक लोक या ट्विटला लाईक करत रिट्विट करत आहेत, तर भाजप समर्थकांकडून यावर टीकाही होत आहे (Kanhaiya Kumar criticize Amit Shah and Jay Shah after Naxal attack on CRPF soldier).

कन्हैय्या कुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “एकिकडे बाप गृहमंत्री-मुलगा बीसीसीआय सेक्रेटरी, तर दुसरीकडे बाप शेतकरी-मुलगा सैनिक आहे. त्यामुळे किती मंत्र्यांची मुलं सैन्यात भरती झालेत हे निर्लज्ज सत्तेला विचारा. भेकड नक्षलवादी हल्ल्यात सर्वसामान्य लोकांचंच रक्त वाहतंर आणि याचा फायदा खुर्चीजीवी घेतात. देशाने हे षडयंत्र समजून घ्यायला हवं. पराक्रमी जवानांना आणि शेतकऱ्यांना सलाम.”

28 हजारपेक्षा अधिक लोकांकडून लाईक, 5 हजारपेक्षा अधिक प्रतिक्रिया

कन्हैय्या कुमार यांचं हे ट्विट बातमी लिहिली जाईपर्यंत तब्बल 28 हजारपेक्षा अधिक लोकांनी लाईक केलंय, तर 7 हजारपेक्षा अधिक लोकांनी रिट्विट केलंय. यातील जवळपास 1 हजार लोकांनी हे ट्विट रिट्विट करताना त्यावर प्रतिक्रिया देखील दिलीय. याशिवाय ट्विटवरही 5 हजारपेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्यात. यात काहींनी कन्हैय्या कुमार यांच्या मताशी सहमती दाखवलीय, तर काहींनी यावर तीव्र आक्षेप घेत कन्हैय्या कुमार यांच्यावर टीका केलीय. टीका करणाऱ्यांमध्ये नामवंत लोकांचाही समावेश आहे.

भाजप समर्थकांकडून कन्हैय्या ट्रोल

गायिका मालिनी अवस्थी यांनी कन्हैय्या कुमार यांच्या या ट्विटला रिट्विट करत अनेक आरोप करत जहरी टीका केलीय. त्यांनी म्हटलंय, “नेता बनण्याचा प्रयत्न करत दारोदार फिरणारा, आपलं डिपॉझिट वाचू न शकणारा, देशाचे तुकडे तुकडे अशा घोषणा देणारा, जवानांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त करणारा, नक्षलवाद्यांना क्रांतीकारी मानणारा नक्षल कॉम्रेड पुन्हा बिळातून बाहेर आलाय. यांना ओळखा आणि ठेचा.”

हेही वाचा :

JNU हल्ल्यानंतर दीपिका पदुकोणही जखमी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ

JNU Sedition case: 3 वर्षांनी आरोपपत्र दाखल

बेगुसरायमध्ये कन्हैय्या कुमारचा तब्बल साडे तीन लाख मतांनी पराभव

व्हिडीओ पाहा :

Kanhaiya Kumar criticize Amit Shah and Jay Shah after Naxal attack on CRPF soldier

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.