बेगुसरायमध्ये कन्हैय्या कुमारचा तब्बल साडे तीन लाख मतांनी पराभव

बेगूसराय: बिहारच्या बेगूसराय या लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या लोकसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकप) कन्हैय्या कुमार विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे गिरिराज सिंह अशी लढत होती. यात कन्हैय्या कुमारचा पराभव झाला आहे.  या लढतीत गिरिराज सिंहानी कन्हैय्या कुमारचा तब्बल 3 लाख 50 हजार मतांनी दारुण पराभव केला आहे. बिहारचा बेगूसराय हा लोकसभा मतदारसंघ …

बेगुसरायमध्ये कन्हैय्या कुमारचा तब्बल साडे तीन लाख मतांनी पराभव

बेगूसराय: बिहारच्या बेगूसराय या लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या लोकसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकप) कन्हैय्या कुमार विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे गिरिराज सिंह अशी लढत होती. यात कन्हैय्या कुमारचा पराभव झाला आहे.  या लढतीत गिरिराज सिंहानी कन्हैय्या कुमारचा तब्बल 3 लाख 50 हजार मतांनी दारुण पराभव केला आहे.

बिहारचा बेगूसराय हा लोकसभा मतदारसंघ भाकपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र याच बालेकिल्ल्यात गिरिराज सिंह यांना तब्बल 5 लाख 74 हजार 671 मतं मिळाली. तर कन्हैय्या कुमारला फक्त 2 लाख 23 हजार 770 मते मिळाली. त्यापाठोपाठ राष्ट्रीय जनता दलचे तनवीर हसन यांना 1 लाख 65 हजार मतं मिळाली. गिरिराज सिंहाना 56 टक्के मत मिळाली. तर कन्हैय्याला 22 विशेष म्हणजे भाजपची ही सर्वात मोठा विजय मानला जात आहे

बिहारचा बेगूसराय मतदारसंघात मुस्लिम मतदार जास्त आहेत. मात्र या मतदारसंघात कन्हैय्या कुमार आणि तनवीर हसन यांच्यात मुस्लीम मतांची विभागणी झाली. याच मतांचा फायदा गिरिराज सिंह यांना झाल्याचं म्हटलं जात आहे.

बिहारच्या बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार निवडणुकीच्या मैदानात उतरला होता. युवा नेता म्हणून ओळख असलेल्या कन्हैय्या कुमारला भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून लोकसभेचे तिकीट देण्यात आलं होतं. मात्र कन्हैय्याचा या लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभव झाला आहे.

कोण आहे कन्हैय्या कुमार?

कन्हैय्या कुमार याचा जन्म बिहारमधील बेगूसरायमध्ये झाला आहे. कन्हैय्या हा जवाहरलाल नेहरु विद्यालयातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आहे. तसेच तो भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशनचा नेता आहे. जेएनयूमधील देशविरोधी कथित घोषणांप्रकरणी कन्हैय्याविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात आली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *