Shivsena Symbol Hearing : शिवसेना फुटीला भाजपची मदत, कपिल सिब्बल यांचा घाम फोडणारा युक्तिवाद; गेम पलटणार?

शिवसेना पक्षफुटी प्रकरणी कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात घाम फोडणारा युक्तिवाद केला. फुटीमागे भाजपची मदत होती आणि ती पूर्वनियोजित होती, असे सिब्बल यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने संघटनेकडे दुर्लक्ष करून फक्त आमदार संख्या पाहिली, तसेच हा मुद्दा राज्यपालांकडे कसा गेला? असा सवालही त्यांनी केला आहे.

Shivsena Symbol Hearing : शिवसेना फुटीला भाजपची मदत, कपिल सिब्बल यांचा घाम फोडणारा युक्तिवाद; गेम पलटणार?
eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2026 | 4:38 PM

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवेळी आज ठाकरे गटाचे नेते कपिल सिब्बल यांनी घाम फोडणारा युक्तिवाद केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेत फूट झाली होती. याची तयारी पूर्वीच झाली होती. त्याला भाजपची मदत होती, असा घाम फोडणारा युक्तिवाद करतानाच फूट ही पक्षांतर्गत होती असं शिंदेंचे वकील म्हणतात तर मग हा मुद्दा राज्यपालांकडे कसा गेला? असा सवाल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती. यावेळी त्यांनी जोरदार युक्तिवाद केला. सुनील प्रभू हे व्हिप आहेत. 22 जून रोजी झालेल्या बैठकीचं पत्र सुनील प्रभू यांनी काढलं होतं. ते पत्र (बैठकीच पत्र) सगळ्यांना पाठवलं होतं. या प्रकरणात सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्या आहेत. हे बंड ठरवून केल आहे. या सगळ्यांमध्ये राज्यपालांची भूमिका महत्वाची होती, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे.

Loading...

आयोगाने नोटीसच दिली नाही

निवडणूक आयोगाने कधीही आम्हला नोटीस दिली नव्हती. संघटनेतील कुठल्याही गोष्टी, स्ट्रक्चर निवडणूक आयोगाने पाहिलं नाही. आयोगाने फक्त विधिमंडळ सदस्यांची संख्या पाहून निर्णय घेतला, असं सांगतानाच पक्षप्रमुख हे पद आमच्या घटनेनुसार आहे. शिवसेनेच्या गटाने ठराव पारित केला होता. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटल होत की, आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीतून बाहेर पडायचं आहे. अजित पवार हे देखील आघाडीचे भाग होते. विचारधारा वगैरे कारणं त्यांच्याकडून दिलं गेली आहेत. मात्र त्याला फार काही आधार नाही, याकडे सिब्बल यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं.

मग उद्धव ठाकरे काय आहेत?

एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नाही. एकनाथ शिंदे म्हणजे फक्त विधिमंडळ पक्षापुरते आहेत. एकवेळ आपण मानू की उद्धव ठाकरे म्हणजे पक्ष नाहीत मग उद्धव ठाकरे काय आहेत? असा सवाल सिब्बल यांनी केला. दरम्यान, आजचा युक्तिवाद संपला आहे. आता पुढच्या आठवड्यात बुधवारी कपिल सिब्बल हे युक्तिवाद करणार आहेत. त्यावेळी सिब्बल काय मुद्दे मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us