“फडणवीस माझे गॉडफादर”, कर्नाटकच्या आमदाराचा राजीनामा देण्यास नकार

कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते रमेश जारकीहोली (Ramesh Jarkiholi ) यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गॉडफादर असल्याचं म्हटलंय.

"फडणवीस माझे गॉडफादर", कर्नाटकच्या आमदाराचा राजीनामा देण्यास नकार


बंगळुरू : कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते रमेश जारकीहोली (Ramesh Jarkiholi ) यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गॉडफादर असल्याचं म्हटलंय. तसेच आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याचंही स्पष्ट केलं. मागील काही दिवसांपासून जारकीहोली पक्षातील काही नेत्यांबाबत नाराज असल्याचं समोर आलं होतं. याबाबत त्यांनी फडणवीसांची भेट घेत चर्चा केली. मात्र, भेटीतील चर्चेचे तपशील देण्यास नकार दिला. ते मैसूरु भेटीनंतर सांबरा विमानतळावर (Sambra airport ) माध्यमांशी संवाद साधला (Karnataka BJP MLA Ramesh Jarkiholi called Devendra Fadnavis God Father).

रमेश जारकीहोली म्हणाले, “मी माझ्या नाराजीबद्दल केवळ जवळच्या मित्र आणि अनुयायांसोबतच चर्चा केली होती. ही माहिती माध्यमांपर्यंत कशी पोहचली याची मला कल्पना नाही. मात्र, मित्र, शुभचिंतक आणि वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर मी माझ्या आमदारकीच्या राजीनाम्याचा विचार सोडून दिलाय.”

“RSS आणि BJP ने दिलेला सन्मान काँग्रेसमध्ये 20 वर्षे असताना मिळाला नाही”

“मला पुन्हा मंत्री होण्यात कोणताही रस नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) माझे गॉडफादर (Godfather) आहेत. म्हणूनच मी त्यांची भेट घेतली. RSS आणि BJP ने मला सन्मान दिलाय. काँग्रेसमध्ये मी 20 वर्षे असताना हा सन्मान मला कधीही मिळाला नाही. काँग्रेस बुडतं जहाज आहे. मी काँग्रेसमध्ये परत जाण्याचा विचारही करत नाही.”

कर्नाटकच्या आमदाराचा मुंबई राजकीय दौरा

असं असलं तरी रमेश जारकीहोली यांनी आपला मुंबई दौरा राजकीय असल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, “मी याबाबत खोट बोलणार नाही. हे खरं आहे की मी मुंबईला माझे गॉडफादर देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो होतो. यात मी त्यांच्याशी पक्षामधील नाराजीसह राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली.”

हेही वाचा :

जयंत पाटील शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना भेटणार; ‘या’ विषयावर होणार चर्चा

सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 24 रुग्णांचा मृत्यू; कर्नाटक हादरले

Belgaum Bypoll | फडणवीसांकडून अपेक्षाच नाही, भेटीसाठी साडेचार वर्ष थांबलेलो, शुभम शेळकेंचा हल्लाबोल

व्हिडीओ पाहा :

Karnataka BJP MLA Ramesh Jarkiholi called Devendra Fadnavis God Father

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI