AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर काँग्रेसच्या बड्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, राजकारणात खळबळ

B Nagendra : कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री बी नागेंद्र यांनी शुक्रवारी कर्नाटक महर्षी वाल्मीकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील कथित 89 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर काँग्रेसच्या बड्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, राजकारणात खळबळ
B Nagendra resignImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 28, 2026 | 8:54 PM
Share

महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कर्नाटकमधून मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री बी नागेंद्र यांनी शुक्रवारी कर्नाटक महर्षी वाल्मीकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील कथित 89 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. रायचूर ते बेल्लारी अशी भाजपची 10 दिवसांची पदयात्रा सुरू होण्याच्या अगोदरच नागेंद्र यांनी राजीनामा दिल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे.

राजीनाम्यानंतर भाजपवर गंभीर आरोप

राजीनामा देताना बी. नागेंद्र यांनी मनुवाद्यांनी आपल्याला लक्ष्य केले असा गंभीर आरोप केला. आदिवासी समाजातील व्यक्तीने पुढे जाऊ नये, अशी काही लोकांची इच्छा असल्याने आपल्याला लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. भाजपवरही निशाणा साधत ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून मला घाबरवता येणार नाही असे नागेंद्र यांनी म्हटले.

मुख्यमंत्री शिवकुमार यांनी दिले होते संकेत

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शुक्रवारीच बी. नागेंद्र आपल्या मंत्रिपदाबाबत लवकरच मोठा निर्णय घेतील, असे संकेत दिले होते. बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना शिवकुमार यांनी सांगितले की, नागेंद्र यांनी सकाळी त्यांच्याशी चर्चा केली असून लवकरच माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. नागेंद्र यांनी स्वतःला काँग्रेसचा शिस्तबद्ध कार्यकर्ता असल्याचे सांगितले असून पक्षाचा निर्णय मान्य करणार असल्याचेही मुख्यमंत्री शिवकुमार यांनी सांगितले होते.

यापूर्वीही दिला होता राजीनामा

वाल्मीकी महामंडळातील निधी कथितरीत्या वळवल्याच्या आरोपांनंतर बी. नागेंद्र यांनी यापूर्वीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, तपास सुरू असतानाच त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात आल्याने विरोधकांनी कर्नाटक सरकारवर सातत्याने निशाणा साधला होता. दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी नागेंद्र यांचा राजीनामा अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. या निर्णयाबाबत सुमारे दहा दिवसांपूर्वीच निर्णय झाला होता, असा दावा त्यांनी केला. तसेच काँग्रेस सरकार वारंवार स्वतःला अशा राजकीय संकटात का ढकलते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आता नागेंद्र यांच्या जागी कोणत्या नेत्याची मंत्रि‍पदी वर्णी लागले हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान