AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला IPS-IAS मधील भांडण सोशल मीडियावर, खाजगी फोटो केले शेअर

दोघांमधील वाद इतका वाढला की डी रूपा हिने सोशल मीडियावर रोहिणी सिंधुरीचे काही खाजगी फोटो शेअर केले. त्याने दावा केला की सिंधुरीनेच तीन पुरुष IAS अधिकाऱ्यांना पाठवली होती.

महिला IPS-IAS मधील भांडण सोशल मीडियावर, खाजगी फोटो केले शेअर
Karnataka IAS vs IPS
| Updated on: Feb 21, 2023 | 5:33 PM
Share

बंगळुरु : दोन लहान मुलांसारखे भांडण सनदी सेवेतील सर्वोच्च अधिकाऱ्यांमध्ये सुरु आहे. दोघांमधील हा कलह इतका टोकाला गेला की त्यांनी खाजगी फोटो सोशल मीडियावर टाकले. या प्रकारामुळे सरकारची बदनामी झाली. अखेर दोन्ही अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या सरकारला कराव्या लागल्या. कर्नाटकात IPS डी रूपा आणि IAS अधिकारी रोहिणी सिंधुरी या दोन महिला नोकरशहामधील हे भांडण आहे. दोघांमधील वाद इतका वाढला की डी रूपा हिने सोशल मीडियावर रोहिणी सिंधुरीचे काही खाजगी फोटो शेअर केले. त्याने दावा केला की सिंधुरीनेच तिची वैयक्तिक छायाचित्रे तीन पुरुष IAS अधिकाऱ्यांना पाठवली होती. रुपा यांनी सिंधुरी यांच्यावर 19 आरोप केले.

दुसरीकडे, सिंधुरी यांनी गेल्या रविवारी एक निवेदन जारी करून रुपा आपली बदनामी करण्यासाठी खोटे आरोप करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान दोघांमधील वादानंतर कर्नाटक सरकारने मोठी कारवाई केली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यांना नवीन पोस्टींगचे ठिकाणही दिले नाही.

कोण आहेत IAS रोहिणी सिंधुरी?

रोहिणी सिंधुरी या 2009 च्या बॅचच्या कर्नाटक कॅडरच्या IAS अधिकारी आहेत. त्या मूळच्या आंध्र प्रदेशातील आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक पदांवर काम केले आहे. सध्या त्या हिंदू धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल विभागाच्या आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तर डी रूपा बद्दल बोलायचे झाले तर ती कर्नाटक हस्तशिल्प विकास महामंडळात एमडी म्हणून कार्यरत आहे.

दावा फेटाळला

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर महिला आयएएस सिंधुरीने आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, डी रूपा माझ्या विरोधात खोटी मोहीम चालवत आहेत. माझी प्रतिमा डागाळण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. जर ही छायाचित्रे मी आयएएस अधिकाऱ्यांना पाठवली असतील तर त्यांनी त्यांची नावेही जाहीर करावीत.

वाद कुठून सुरु झाला

जनता दलाचे आमदार महेश यांच्यांसोबत आयएएस अधिकारी सिंदुरी यांचा फोटो व्हायरल झाला. त्या घटनेपासून दोघांमध्ये वाद सुरु झाला. 2021 मध्ये सिंधुरी म्हैसूरमध्ये होत्याा. त्यावेळी दोघांनी एकदुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. डी रूपा यांनी शनिवारी 18 फेब्रुवारी रोजी सिंधुरी यांच्यावर 19 आरोप केले. यामध्ये भूमी अभिलेख विभागातील अधिकाराचा गैरवापर, रिअल इस्टेटमधील घराणेशाही, अघोषित मालमत्ता आणि आयएएस अधिकारी डीके रवी यांच्या गूढ मृत्यूमध्ये त्यांची भूमिका आदी आरोपांचा समावेश आहे.  दरम्यान या वादानंतर दोन्ही अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यांना नवीन पोस्टींगचे ठिकाणही दिले नाही.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.