AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mallikarjun Kharge : थोडीशीही लाज असेल तर शहांचा राजीनामा घ्या – आक्रमक मल्लिकार्जुन खरगेंची मोदींकडे मागणी

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची विरोधकांनी तीव्र मागणी केली आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज, पॅलेट गन वापर आणि नंतर विद्यार्थ्यांवर सूडाने केलेल्या कारवाईवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आक्रमक झाले आहेत. आंदोलन मागे घेताना दिलेल्या आश्वासनांवरून सरकार फिरल्याचा आरोप करत, थोडीही लाज शिल्लक असेल तर शहांचा राजीनामा घ्यावा, असे खरगे यांनी पंतप्रधान मोदींना सुनावले आहे.

Mallikarjun Kharge : थोडीशीही लाज असेल तर शहांचा राजीनामा घ्या - आक्रमक मल्लिकार्जुन खरगेंची मोदींकडे मागणी
अमित शाहांच्या मागणीवरून मल्लिकार्जुने खरगे आक्रमक
| Updated on: Jul 31, 2026 | 11:31 AM
Share

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापरावरून, लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता काँग्रेसचे अध्यक्ष, नेते मल्लिकार्जुन खर्गेही याच मागणीवरूवन आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांविरोधात “सूडाच्या भावनेने कारवाई” केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी X वर एक पोस्ट करत केली आहे. थोडीही लाज शिल्लक असेल तर अमित शाह यांचा राजीनामा घ्या, असं खर्रगे यांनी या पोस्टमधून सुनावलं आहे. त्यांच्या या ट्विवने खळबळ माजली आहे.

काय म्हणाले खरगे ?

मल्लिकार्जुन खरगे यांनी 20 जुलै रोजी दिल्लीमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या “बळाचा वापर” केल्याचा उल्लेख करत ‘एक्स’वर पोस्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून त्यांनी हे ट्विट केलं आहे.  दहा दिवसांपूर्वी सरकारने तरुणांवर “लाठी-काठ्या आणि पॅलेट गनचा वापर करून दडपशाही” केली, असं त्यांनी म्हटलं. विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत आणि त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले जात आहे, असा दावा पुढे खरगे यांनी केला.

“तरुणांनी आंदोलन या अटीवर मागे घेतले होते की त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, परंतु आता सरकारे स्वतःच्या शब्दावरून मागे फिरली आहेत.” असं खरगे म्हणाले. तरुणांची सोशल मीडिया अकाऊंट्स बंद केली जात आहेत आणि मुलींची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केली जात आहे, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

गृहमंत्री अमित शाह संसदेत पाऊल ठेवू शकले नाहीत आणि जबाबदारीसंदर्भात निवेदन देण्यापासून ते दूर राहिले. आता “प्रतिमा वाचवण्याचे डावपेच चालणार नाहीत, तरुणांना तुमचे सत्य कळून चुकले आहे.” अस म्हणत “थोडीशीही लाज उरली असेल तर अमित शाह यांचा राजीनामा घ्या.” असं खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून म्हटलं.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा