रोहित सरदानांच्या मृत्यूवर रविशकुमार काय म्हणाले? वाचा सविस्तर

प्रसिद्ध अँकर रोहित सरदाना यांच्या मृत्यूनंतर मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध पत्रकार रविश कुमार यांनी देखील धक्का बसल्याची भावना व्यक्त करत काही मूलभूत प्रश्न उपस्थि केलेत.

रोहित सरदानांच्या मृत्यूवर रविशकुमार काय म्हणाले? वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 5:51 AM

नवी दिल्ली : प्रसिद्ध अँकर रोहित सरदाना यांच्या मृत्यूनंतर देशभरातून दुःख व्यक्त करण्यात आलं. या निधनाच्या बातमीनंतर मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध पत्रकार रविश कुमार यांनी देखील धक्का बसल्याची भावना व्यक्त करत काही मूलभूत प्रश्न उपस्थि केलेत. यात त्यांनी एकूणच देशातील कोरोनाची स्थिती आणि ती हाताळण्यात नेमकी काय चूक होतेय असा प्रश्न विचारलाय. रोहित सरदाना यांना आदरांजली वाहताना रविश यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना रुग्णालयांमध्ये दाखल का व्हावं लागत आहे? असाही प्रश्न विचारला. शिवाय तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुभवांचा जिल्हा पातळीवरील डॉक्टरांनाही उपयोग व्हावा आणि त्यासाठी एक कमांड सेंटर सुरु करावं, अशी मागणी त्यांनी केली (Know all about What journalist Ravish Kumar write after death of Anchor Rohit Sardana)

रविश कुमार यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं, “आज तकचे अँकर रोहित सरदाना यांच्या निधनाने मला धक्का बसला. मी त्यांना कधी भेटलेलो नाही, मात्र, त्यांना टीव्हीवर पाहूनच ते शरीराने तंदुरुस्त असल्याचा अंदाज यायचा. इतक्या तंदुरुस्त माणसाबाबत अशी परिस्थिती का ओढावली असा मी आत्ता विचार करतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक रुग्णालयांमध्ये भरती कसे होत आहेत? लोकांना त्यांची लक्षणं ओळखू येत नाहीये का? ते डॉक्टरांचं ऐकत नाहीये, की एकापेक्षा अधिक डॉक्टरांच्या सल्ल्यांमध्ये त्यांचा गोंधळ होतोय? या प्रकरणात हलगर्जीपणा झाला असेल असं मला म्हणायचं नाहीये. हे प्रश्न मी केवळ रोहितसाठी विचारत नाहीये. सध्या हे केवळ दिल्लीत होतंय असं नाही हेही लक्षात घ्यायला हवं. असंच जिल्हा आणि खेड्यांमध्येही होत आहे.”

“लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णालयांमध्ये दाखल व्हावं लागण्याचं कारण काय?”

“घरी राहून उपचार घेण्यात नेमकी काय कमतरता आहे की लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णालयांमध्ये दाखल व्हावं लागतंय या प्रश्नाचं उत्तर मला मिळेना. अनेक ठिकाणांवरुन डॉक्टरांचे व्हॉट्सअॅप फॉरवर्ड येत आहेत. यात औषधांची नाव आहेत. त्यानंतर रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात काही संवाद होतो की नाही. मी डॉक्टर नाहीये, मात्र मी स्वतः कोविड झालेला असतान जे अनुभवलंय त्यावरुन रुग्ण आणि डॉक्टरमध्ये संवाद कमी असल्याचं वाटतं. सध्याच्या काळात डॉक्टर प्रचंड दबावात आहेत आणि रुग्ण तर डॉक्टरांपेक्षाही जास्त डॉक्टर झालेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

“कमांड सेंटर सुरु करुन चांगल्या डॉक्टरांचा अनुभव जिल्ह्यातील डॉक्टरांनाही व्हावा”

रविश कुमार पुढे म्हणाले, “मी एक असं कमांड सेंटर सुरु करण्याचा सल्ला दिला होता जेथे कोणत्याही औषधांच्या चिट्ठ्या आणि रुग्णांच्या तापाच्या तपशीलाचा अभ्यास केला जाईल आणि जर कुठं काही चूक होत असेल तर ती दुरुस्त केली जाईल. यामुळे चांगल्या डॉक्टरांच्या अनुभवांचा उपयोग तात्काळ जिल्ह्यांपर्यंत पोहचले. यातून डॉक्टरांचं जग आपले अनुभव एकमेकांशी शेअर करत राहिल. हे काम कमांड सेंटरच्या माध्यमातूनच होऊ शकतं. कारण डॉक्टरांकडे व्यक्तिगतपणे कमी वेळ आहे. रोहितच्या मृत्यूनंतर मी स्तब्ध झालेलो असतानाही या प्रश्नांवरुन माझी नजर बाजूला जाईना. येथे मुद्दा विश्वासहार्य डॉक्टरचा किंवा चांगल्या-वाईट डॉक्टरचा नाहीये. येथे मुद्दा इतक्या मोठ्या प्रमाणात लोक रुग्णालयात का भरती होत आहेत या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आहे.”

“रोहितच्या मृत्यूच्या बातमी न्यूज रुममधील त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातापायांचा थरकाप उडाला असेल”

“अनेक लोक म्हणत आहेत आज तकने रोहित सरदाना यांच्या निधनाची साधी पट्टीही चालवली नाही. मला वाटतं या विषयाला महत्त्व द्यायला नको. तुम्ही विचार करा की ज्या न्यूज रुममध्ये ही बातमी पोहचली, तेथे बॉम्ब प्रमाणे स्फोट झाला असेल. त्यांच्या सहकाऱ्यांचं भान हरपलं असेल. सर्वांचे हातपायांचा थरकाप होत असेल. त्यामुळे केवळ या गोष्टींची कल्पना करा तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील. दुसरी गोष्ट अशीही आहे की रोहितच्या घरात अनेक ज्येष्ठ लोकही असतील. त्यांना योग्यवेळी याबाबत माहिती द्यावी लागली असेल. जर चॅनलवर ते सांगितलं असतं तर त्यांच्या कटुंबियांवर काय प्रसंग बेतला असता. तेव्हा अनेकदा अशी परिस्थिती असते. याशिवायही अनेक अशा गोष्टी असतील ज्यांचा त्यांचे सहकारी न्यूज रुममध्ये सामना करत असतील. ही बातमी लगेच बाहेर आलेली नसली तरी त्यांच्या डोळ्यासमोरुन तर गेलेली असणार आहे,” असं रविश कुमार यांनी सांगितलं.

“माहिती आणि प्रसारण मंत्रालय आतापर्यंत इतक्या पत्रकारांचे मृत्यू झाले पण गप्प”

रविश कुमार पुढे म्हणाले, “बातमी खूप दुखद आहे. कोविडच्या काळात अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागलाय. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत कधीही ट्विट केलं नाही. आतापर्यंत देशात कितीतरी पत्रकारांचा जीव गेलाय. माहिती प्रसारण मंत्रालयाने त्याबाबत काही म्हटलंय? त्यांना प्रत्येक क्षणाला पंतप्रधानांची प्रतिमा उजळण्यातून वेळ मिळत नाही. या देशात एकच काम राहिलंय ते म्हणजे लोक मरोत पण मोदीजींची प्रतिमा चकमवत राहा. तुम्ही लोक देखील मोदींचे 20-20 फोटो घरात लावा. ते फोटो दररोज स्वच्छ करत उजळत राहा. त्यांना ट्विट करा म्हणजे आपली प्रतिमा घराघरात चमकतेय हे पाहून त्यांना समाधान वाटेल.”

“कमेंट बॉक्समध्ये येऊन मला शिव्या देत राहा, पण त्यामुळे सत्य बदलणार नाही”

“सामान्यांचे जीव गेलेत. प्रतिष्ठित आणि प्रभावी लोकांना रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळाले नाही. तुम्ही विश्वास ठेवा अथवा नका ठेऊ पण या सरकारने सर्वांनाच चांगलं फसवलंय. तुम्ही निवडणुकीतील विजयाचा घंटा बांधून फिरत राहा. कमेंट बॉक्समध्ये येऊन मला शिव्या देत राहा. मात्र, यामुळे सत्य बदलणार नाही. लिहिलं म्हणून गुन्हे दाखल करणे आणि पोलीस पाठवण्याची वेळ परिस्थिती गंभीर झाल्याने आलीय. जे लोक अशा प्रकारच्या कारवाईसोबत आहेत ते माणुसकीसोबत नाहीयेत,” असंही ते म्हणाले.

रविश कुमार यांच्या पोस्टमधील महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे,

  • या देशात खोट्यापासून वाचा. स्वतःचं खोट्या माहितीपासून संरक्षण करा. जोपर्यंत तुम्ही खोट्या माहितीतून बाहेर येणार नाही तोपर्यंत लोकांचे जीव वाचवता येणार नाही. स्वतःला, देशाला खोट्यापासून वाचवा.
  • धर्म नेहमीच राजकारणाचा सत्यानाश करतो आणि त्यापासून बनलेल्या राजकीय समाजाचाही नाश करतो. अशा राजकीय आणि धार्मिक समाजात तर्क आणि तथ्य समजून घेण्याची क्षमता संपते. त्यामुळेच व्हॉट्सअॅप ग्रुपवर नातेवाईक सरकारचं समर्थक करत आहेत. खरंतर त्यांनी प्रश्न विचारायला हवा होता. समर्थक म्हणून याच नातेवाईकांनी दबाव तयार केला असता तर सरकारवरही दबाव तयार झाला असता.
  • अजूनही सरकारकडून सर्व ठिकाणी फोटोबाजीच सुरु आहे. असं केल्याने कुणाचा जीव वाचत असेल तर मला जरुर कळवा. मात्र, वास्तवात यामुळे कुणाचाही जीव वाचला नाही. आकडेवारी लपवा, कुठेही छापू नका. असं करणं खूप पराक्रमाचं काम आहे. अभिनंदन. तुम्ही सर्वांना घाबरवतात आणि सर्वजण घाबरतात.सरकारचं किती चांगलं वैशिष्ट्य आहे. घराघरात लोकांचे जीव गेलेत. त्यांना माहिती आहे की कोण, कधी, कसं मेलंय.
  • रोहित सरदाना यांना आदरांजली. त्यांच्या कुटुंबाविषयी विचार करतो आहे. ते या धक्क्यातून कसे सावरणार आणि अशा धक्क्यांमधून कुणाला बरं सावरता येतं. मी भारत सरकारकडे मागणी करतो की त्यांनी रोहितच्या कुटुंबाला 5 कोटी रुपयांच्या मदतीचा चेक द्यावा. जेणेकरुन त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही अडचणीचा त्रास होणार नाही.
  • सरकारला पत्रकारांना मदत करण्यात मागे हटायला नको. अगदी इतर पत्रकारांनाही मदत द्या. या निमित्ताने कमीत कमी ज्या पत्रकारांचा या काळात मृत्यू झालाय त्यांच्याबद्दल सरकाने विचार करायला हवा. आज तकमध्ये रोहितच्या सहकाऱ्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.
  • जे लोक रोहितच्या निधनानंतर वाईट लिहित आहेत त्यांनी इथं कर्तव्य माणूस म्हणून आहे हे लक्षात ठेवावं. माणूसकीचं कर्तव्य कोणत्याही अटीवर आधारीत नसतं. म्हणूनच माणूस बना. सध्या भाषेत माणूसकी आणा. एवढी क्षुल्लक गोष्ट समजू शकले नाहीत तर अवघड आहे.
  • विनम्र बना, त्यापेक्षा मोठं काही नाही. कुणालाही माहिती नाही की कोण कुणापासून दूर जाईल. सध्याच्या काळात सर्व वाद आणि बदले बिनकामाचे आहेत.

हेही वाचा :

Rohit Sardana Death : देश सुन्न, लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन, कोरोनावरील उपचारादरम्यान हृदयविकाराचा धक्का

PHOTO | ऑल इंडिया रेडिओ ते आज तकचा राईटीस्ट आवाज कोरोनाने हिरावला, जाणून घ्या रोहित सरदानांच्या आयुष्याबद्दल

Rohit Sardana | स्वत: कोरोनाग्रस्त असतानाही इतरांसाठी काळजी, रोहीत सरदानांचे शेवटचे 3 ट्विट पाहिलेत का?

व्हिडीओ पाहा :

Know all about What journalist Ravish Kumar write after death of Anchor Rohit Sardana

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.