Petrol Diesel Price : केंद्राचा करकपातीचा निर्णय, कोणत्या राज्यात पेट्रोल सर्वात स्वस्त? जाणून घ्या- प्रमुख राज्यांतील दर

Petrol Diesel Price : केंद्राचा करकपातीचा निर्णय, कोणत्या राज्यात पेट्रोल सर्वात स्वस्त? जाणून घ्या- प्रमुख राज्यांतील दर

वाढत्या महागाईमुळे (INFLATION RATE) सर्वसामान्यांसमोर समस्यांचा डोंगर निर्माण झाला होता. केंद्रानं कराला कात्री लावल्यामुळं राज्य सरकारच्या कोर्टात चेंडू गेला आहे. कर कपातीसाठी राज्य सरकारांवर दबाव वाढला आहे.

दादासाहेब कारंडे

|

May 21, 2022 | 10:13 PM

नवी दिल्ली– केंद्र सरकारनं इंधन दरात कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील अबकारी (PETROL-DIESEL EXCISE TAX) कराला कात्री लावले आहे. पेट्रोल वरील केंद्रीय अबकारी कर 8 रुपये प्रति लीटर आणि डिझेल वरील 6 रुपये प्रति लीटरने (Petrol Price) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या सुधारित निर्णयामुळं पेट्रोलची किंमत प्रति लीटर 9.5 रुपये आणि डिझेलची किंमत प्रति लीटर 7 रुपयांनी कमी होणार आहे. वाढत्या महागाईमुळे (INFLATION RATE) सर्वसामान्यांसमोर समस्यांचा डोंगर निर्माण झाला होता. केंद्रानं कराला कात्री लावल्यामुळं राज्य सरकारच्या कोर्टात चेंडू गेला आहे. कर कपातीसाठी राज्य सरकारांवर दबाव वाढला आहे. केंद्रासोबत राज्यांनी अबकारी करात कपात केल्यास जनतेला दुहेरी दिलासा मिळण्याची शक्यता वाढली आहे. देशातील प्रमुख राज्यात दर कपातीनंतरचा आलेख जाणून घेऊया-

प्रमुख राज्यांतील पेट्रोलचे दर (जुने दर/नवे दर)

· नवी दिल्ली – 105.41/95.91

· महाराष्ट्र(मुंबई)-120.51/111.01

· पश्चिम बंगाल (कोलकाता)-115.12/111.01

· राजस्थान(जयपूर)-118.03/108.53

· उत्तर प्रदेश (लखनौ)- 105.25/95.75

· बिहार (पटना) -116.23/106.73

· मध्यप्रदेश (भोपाळ)- 118.14/108.64

प्रमुख राज्यांतील डिझेलचे दर (जुने दर/नवे दर)

· नवी दिल्ली 96.67/89.67

· महाराष्ट्र(मुंबई)104.77/97.77

· पश्चिम बंगाल (कोलकाता)99.83/92.83

· राजस्थान(जयपूर)100.92/93.92

· उत्तर प्रदेश (लखनौ) 96.83/89.83

· बिहार (पटना) 101.06/94.06

· मध्यप्रदेश (भोपाळ) 101.16/94.16

‘ग्रोथ रेट’ बूस्टर

पेट्रोल-डिझेल दरांत कपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणा आहे. इंधनाचे दराला कात्री लागल्यामुळे अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या खिशाचा भार हलका होणार आहे. दळवळणाचा खर्चही घटणार आहे. महागाईच्या दरात घसरण आल्यास रिझर्व्ह बँकेला विकास दरवाढीवर लक्ष केंद्रित करण्यास चालना मिळेल.

युद्धामुळे भाव गगनाला-

इंधन दरवाढीचा थेट परिणाम खाद्यपदार्थांच्या भाववाढीवर झाला आहे. दैनंदिन जीवनातील महत्वाचा घटक असलेल्या गव्हाच्या पिठाच्या दरात 1 जानेवारीपासून आतापर्यंत 5.81 टक्के दरवृद्धी झाली आहे. यामध्ये उच्चांकी पातळी एप्रिल महिन्यात गाठण्यात आली. एप्रिल महिन्यात गव्हाच्या पिठाचे दर सर्वात उच्चांकी पातळीवर गेल्याचे दोन वर्षात समोर येत आहे. सर्वच क्षेत्रातील महागाईसाठी रशिया-युक्रेन युद्धाला कारणीभूत ठरविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या युद्धामुळे डिझेलचे दर वाढले असून वाहतूक खर्चात झालेली वाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें