कोण आहेत पीयूष जैन?, 150 कोटींचं घबाड सापडलं; कुबेराचा पसारा कुठे कुठे?

अत्तर, पानमसालासह अनेक व्यवसाय असलेले व्यापारी पीयूष जैन यांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. छापेमारीचा आज दुसरा दिवस आहे.

कोण आहेत पीयूष जैन?, 150 कोटींचं घबाड सापडलं; कुबेराचा पसारा कुठे कुठे?
raid at Piyush Jain home
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 5:59 PM

कानपूर: अत्तर, पानमसालासह अनेक व्यवसाय असलेले व्यापारी पीयूष जैन यांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. छापेमारीचा आज दुसरा दिवस आहे. या छापेमारीत जैन यांच्या घरातील कपाटांमध्ये आयकर विभागाला नोटांचे प्रचंड बंडल सापडले आहेत. ही रक्कम तब्बल 150 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातील 90 कोटी रुपये आयकर विभागाने जप्त केले आहेत. या सर्वात मोठ्या रेडमुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे.

कोण आहेत जैन

कनौजच्या छपट्टी मोहल्ल्यातील आनंदपुरी येथील होली चौकात पीयूष जैन राहतात. ते अत्तराचे व्यापारी आहेत. कन्नौज येथे त्यांची अत्तराची फॅक्ट्री आहे. त्यांच्या अत्तराची निर्यात केली जाते. हे अत्तर आधी मुंबईत आणलं जातं. त्यानंतर संपूर्ण देशात आणि विदेशात नेलं जातं. कानपूर आणि मुंबईत त्यांच्या कुटुंबातील अनेक लोक राहतात. मुंबई आणि कानपूरमध्येही त्यांचे कार्यालये आहेत.

सपा नेत्याचे नातेवाईक

पीयूष जैन यांचा अत्तराचा मोठा व्यवसाय आहे. कन्नौजमधून हा व्यवसाय चालतो. त्यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीसाठी समाजवादी अत्तर या नावाने विशेष अत्तर तयार केलं होतं. या अत्तराच्या लॉन्चिंगवेळीही ते उपस्थित होते. समाजवादी पार्टीचे विधान परिषदेतील आमदार पम्मी जैन यांचे ते नातेवाईक आहेत. समाजवादी अत्तर तयार करण्यासाठी 2 संशोधकांनी चार महिने मेहनत घेतली होती. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या 22 अत्तरांचा यात समावेश करण्यात आला आहे. 2024मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जैन समाजवादी पार्टीसाठी आणखी एक अत्तर तयार करणार होते.

पैसे मोजण्यासाठी चार मशिन्स मागवल्या

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील व्यापारी पीयूष जैन यांच्या घरी आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. या छापेमारीवेळी आयकर विभागाला कपाटं भरून भरून नोटा सापडल्या आहेत. कुबेराचं हे घबाड पाहून स्वत: आयकर विभागाचे अधिकारी चक्रावून गेले आहेत. पीयूष जैन हे कानपूरच्या कन्नौज येथे राहतात. गुरुवारी त्यांच्या कार्यालय आणि घरी छापे मारण्यात आले. यावेळी त्यांच्या घरातील कपाटांमध्ये नोटा खच्चून भरलेले असंख्य बॉक्स सापडले. या नोटा एवढ्या मोठ्या प्रमाणात होत्या की आयकर विभाला या नोटा मोजण्यासाठी चार मशीन मागवाव्या लागल्या. गुरुवारी छापा मारल्यानंतर या नोटांचे बॉक्स ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर नोटा मोजण्यास सुरुवात झाली. चार अत्याधुनिक मशीन असूनही रात्रभर या नोटा मोजाव्या लागल्या. तब्बल 24 तासांपासून नोटा मोजण्याचं काम सुरू आहे. नोटा मोजता मोजता अधिकाऱ्यांचे खांदे आणि हात दुखले आहेत. जेवण करण्यासाठीही त्यांना फुरसत मिळत नाहीये. पण नोटा काही कमी होताना दिसत नाहीये.

संबंधित बातम्या:

Photo Gallery: कपाटांमध्ये कचऱ्यासारख्या नोटा, रात्र सरली तरी नोटा मोजणे सुरूच; घबाड पाहून अधिकारीही चक्रावले

New year good luck plants| पैशाची चणचण भासतेय? आता नवीन वर्षात धनलाभ होणार, ही 4 झाडे घरी आणाच

Christmas 2021 | जगातील सर्वात जुने चर्च जिथे 6 जानेवारीला साजरा होतो ख्रिसमस! तुम्हाला माहितेय का याबद्दल?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.