कुंभमध्ये अंघोळीला गेली… हाती लागली अशी चीज… करोडो लोक आले, पण कुणालाच नाही दिसली
कुंभमेळ्यातील प्रचंड गर्दीत एका महिलेने असाधारण चातुर्य दाखवत रस्त्यावर पडलेली चाकवताची भाजी ओळखली. सर्वांनी तिला दुर्लक्ष केले पण तिने ही दुर्मिळ आणि महागडी भाजी गोळा केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तिच्या चातुर्याचे कौतुक केले जात आहे.

कुंभमेळ्यात देशभरातील लोक आले आहेत. या ठिकाणी पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. कुणाला वैराग्य आल्याने साधू बनत आहे, तर कुणावर तरी साधूंच्या आशीर्वादाची कृपा होत आहे. कुणाची बायको, नवरा हरवत आहे, तर कुणाला तरी या महामेळ्यात काही तरी अनमोल गोष्ट सापडत आहे. एक महिलाही कुंभमेळ्यात अंघोळाली गेली होती. डुबकी मारायला निघालीच होती, पण रस्त्याच्याकडेला तिची नजर गेली अन् तिला जे काही दिसलं ते अनमोल होतं. करोडो लोक कुंभमेळ्यात आहेत. पण या महिलेच्याच हाती ही वस्तू लागली. त्यामुळे सध्या कुंभमेळ्यात त्याचीच चर्चा आहे.
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये आतापर्यंत 54 कोटीहून अधिक लोकांनी स्नान केले आहे. गंगेत स्नान केल्यानंतर अनेकांनी गंगाजल घरीही आणलं आहे. पण कोट्यवधी लोकांमध्ये एकच महिला अशी आहे की जे तिने पाहिलं ते कुणाच्याच नजरेत आलं नाही. अंघोळीला गेलेल्या या महिलेला ते दिसलं. कुणाचीच नजर त्या गोष्टीवर पडली नाही. कदाचित लोकांच्या नजरेला पडलंही असेल. पण त्यांनी इग्नोर केलं असेल.
अन् चाकवत तोडू लागली
ही महिला कुटुंबासोबत संगमामध्ये अंघोळीला गेली होती. संगमकडे जाताना रस्त्यावर पडलेल्या चाऱ्याकडे तिची नजर गेली. सर्व लोक चारा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून जात होते. खरं तर तो चारा नव्हता तर चाकवताची भाजी होती. बिहार आणि उत्तर प्रदेशात चाकवताची भाजी चविने खाल्ली जाते. शहरात ही भाजी अत्यंत महागात मिळते. महिलेला जशी चाकवताची भाजी मिळाली तसं तिने ही भाजी तोडायला सुरूवात केली. अन् संपूर्ण थैली भरून ही भाजी घेतली.




लोकांकडून कौतुक
ही महिला चाकवताची भाजी तोडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक कमेंट येत आहेत. या महिलेच्या चाणाक्ष नजरेचं कौतुक केलं जात आहे. प्रत्येक ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी दिसतात, ही तर भारतीय महिलांची खासियत आहे, अशी कमेंट एकाने केलीय.
चाकवत एक प्रकारची पालेभाजी. ही वर्षायू वनस्पती ॲमरँटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव चिनोपोडियम आल्बम आहे. जगभर सर्वत्र या ओषधीची लागवड केली जाते. फक्त थंडीच्या दिवसातच ही भाजी मिळते. थंडीच्या दिवसात ही भाजी खाणं अत्यंत चांगलं मानलं जातं. त्यामुळे अनेक आजार दूर होतात असं सांगितलं जातं. ही औषधी भाजी आहे.