Lakhimpur Kheri Update: आशिष मिश्राला डेंग्यूची लागण, रूग्णालयात दाखल

लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणात अटक झालेला केंद्रीय मंत्री आजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे आशिषला रूगणालयात दाखल करण्यात आले आहे. आशिषला शुक्रवारी पोलीस कोठडीत नेण्यात आले होते आणि संध्याकाळपासून त्याने ताप आल्याची तक्रार केली होती. शनिवारी संध्याकाळी 10 वाजता त्याला रूगणालयात […]

Lakhimpur Kheri Update: आशिष मिश्राला डेंग्यूची लागण, रूग्णालयात दाखल
आशिष मिश्रा
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 1:50 PM

लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणात अटक झालेला केंद्रीय मंत्री आजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे आशिषला रूगणालयात दाखल करण्यात आले आहे. आशिषला शुक्रवारी पोलीस कोठडीत नेण्यात आले होते आणि संध्याकाळपासून त्याने ताप आल्याची तक्रार केली होती. शनिवारी संध्याकाळी 10 वाजता त्याला रूगणालयात दाखल केले गेले. लखीमपूर खिरी हिंसाचारातील कथित संबंधाप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. (lakhimpur kheri ashish mishra arrested admitted to hospital for dengue)

आशिष मिश्रा पोलीस कोठडीमध्ये होता आणि शनिवारी संध्याकाळी त्याला जिल्हा कारागृहातील आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्याची तब्येत बिघडल्याने पुढील उपचारासाठी त्याला जेलच्या आवारातील रुगणालयात दाखल करण्यात आले आहे, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) अरुण कुमार सिंह यांनी सांगितले.

लखीमपूर खिरी प्रकरण काय आहे

आशिषविरुद्ध लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणात गंभीर अरोप आहेत. 3 ऑक्टोबरला लखीमपूर खिरीच्या टिकुनिया येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर त्यांनी थेट कार चाढवली असा त्याच्यावर आरोप आहे. या घटनेत एकूण आठ जणांची मृत्यू झाला, ज्यात चार शेतकरी, दोन भाजप कार्यकर्ते, एक पत्रकार आणि चालकाचा समावेश आहे. आशिष मिश्रा आणि इतरांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

आशिष मिश्रा हा मुख्य आरोपी आहे. आतापर्यंत या घटनेत एकूण 13 लोकांना अटक झाली आहे. आशिषवर भारतीय दंड विधानाच्या कलम १४७, १४८, १४९ (दंगलीशी संबंधित कलमे), २७९ (बेदरकारपणे गाडी चालवणे), ३३८ (जीवाला धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीने एखाद्याला इजा करणे), ३०४ अ, ३०२ (हत्या), आणि १२० ब ( गुन्हेगारी कट रचणे ) अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

देशभरात पडसाद उमटतले

लखीमपूर खेरीतील हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद देशभरात उमटतले. या हिंसाचाराविरुद्ध महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारकडून 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात होता. मंत्री नवाब मलिक भाजपवर जोरदार टीका करत म्हणाले की केंद्रीय मंत्र्यांच्या मुलानं शेतकऱ्यांवर गाडी चढवली. त्यात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. इतका नरसंहार झाल्यानंतरही गुन्हा दाखल व्हायला उशीर झाला. भाजप हे शेतकऱ्यांच्या शेतमालाची लूट करणारा पक्ष आहे. शेतकऱ्यांची हत्या करणारा हा पक्ष आहे. त्यांना आळा घालणं गरजेचं आहे, असंही नवाब मलिक म्हणाले.

इतर बातम्या

IND vs PAK, T20 World Cup 2021: कशी असेल पाकिस्तानविरुद्ध भारताची प्लेइंग XI? विराट कोहली म्हणाला एक संतुलित संघ…

कोळशाचा तुटवडा, पेट्रोल-डिझेलचे भावही गगनाला भिडले; मोदी सरकारने उचललं महत्त्वाचं पाऊल

NEET UG Result 2021: नीट यूजी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार, रिझल्ट कुठं पाहणार?

(lakhimpur kheri ashish mishra arrested admitted to hospital for dengue)

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.