आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची शेवटची संधी, त्यानंतर 10,000 रुपये दंड

आयकर विभागाने (Income Tax) आधार कार्ड पॅनशी लिंक करण्यासाठी शेवटची संधी दिली आहे. यानंतर आधार लिंक न करणाऱ्यांना 10,000 रुपयांचा दंड होणार आहे.

आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची शेवटची संधी, त्यानंतर 10,000 रुपये दंड

नवी दिल्ली : आयकर विभागाने (Income Tax) आधार कार्ड पॅनशी लिंक करण्यासाठी शेवटची संधी दिली आहे. यानंतर आधार लिंक न करणाऱ्यांना 10,000 रुपयांचा दंड होणार आहे (Last date to link Aadhar Card with PAN). यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यानंतर करदात्यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्यासाठी आयकर विभागाने अनेकदा अंतिम मुदतीत वाढ केली आहे. मात्र यावेळी केंद्रीय आयकर विभागाने (CBIT) कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार 31 मार्चपर्यंत आपलं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक न करणाऱ्या करदात्यांचं पॅन कार्ड रद्द होईल. त्यानंतर कोणत्याही करदात्याने आपल्या त्या पॅन कार्डचा वापर केला, तर हे आयकर कलम 272 (ब) चं उल्लंघन मानून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. त्याअंतर्गत 10,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

केंद्रीय आयकर विभागाने नुकतेच आयकर कायदा 1962 मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसर कलम 114 (AA) आणि उपकलम 114 (AAA) चा समावेश करण्यात आला आहे. यानुसार जे लोक 31 मार्चपर्यंत आपलं आधार कार्ड पॅन कार्डशी जोडणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार आहे. 1 जुलै 2017 च्या आधी आधार कार्ड मिळालेल्या नागरिकांना 31 मार्चआधी आधार आणि पॅन लिंक करणे अनिवार्य आहे.

Last date to link Aadhar Card with PAN

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *