AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातमध्ये मुख्यमंत्री पटेल पण दबदबा ओबीसी मंत्र्यांचा? वाचा पटेल मंत्रीमंडळाचं जातीनिहाय समीकरण

नो रिपीट फॉर्म्युल्या  (No Repeat Formula) अंतर्गत भाजपने मोठे फेरबदल केले आणि देशाच्या राजकारणात एक नवा पायंडा पाडला. मात्र, हे फेरबदल नक्की कशासाठी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नव्या मंत्रिमंडळात जात आणि प्रांत फॅक्टरचा किती विचार केला गेला आहे?

गुजरातमध्ये मुख्यमंत्री पटेल पण दबदबा ओबीसी मंत्र्यांचा? वाचा पटेल मंत्रीमंडळाचं जातीनिहाय समीकरण
Bhupendra Patel
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 5:59 PM
Share

अहमदाबाद: भाजपने गुजरातमध्ये आधी मुख्यमंत्री ( Bhupendra Patel) बदलले, मग आधीच्या मंत्र्यांना हटवलं आणि त्यांच्याजागी नव्याकोऱ्या चेहऱ्यांना बसवलं आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षही बदलले. नो रिपीट फॉर्म्युल्या  (No Repeat Formula) अंतर्गत भाजपने मोठे फेरबदल केले आणि देशाच्या राजकारणात एक नवा पायंडा पाडला. मात्र, हे फेरबदल नक्की कशासाठी असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर राजकीय विश्लेषकांना दिसते ती पुढच्या वर्षी गुजरातमध्ये येऊ घातलेली विधानसभेची निवडणूक.( Gujarat Assembly Election 2022 ) आणि या निवडणुकीसाठीची जातीय आणि प्रांतीय समीकरणं. आता तुम्ही म्हणाल, नव्या चेहऱ्यांना संधी दिली, तर त्यात कसली जात आणि प्रांत. पण राजकारण इतकंही सोपं नसतं, मतांचं गाठोडं सांभाळण्याचा सगळा प्रयत्न भाजपने या मंत्रिमंडळ बदलातून दिला आहे. तो कसा तेच आम्ही तुम्हाला समजावून सांगतो आहे. ( List of caste-wise and province-wise ministers in the Gujarat cabinet. Chief Minister Bhupendra Patel’s Cabinet)

गुजरातच्या मंत्रिमंडळात जातीय समीकरण

गुजरातच्या मंत्रिमंडळात जातिय समीकरणानुसार मंत्रीपदं कशी वाटली गेली आहेत, हे मंत्र्यांची यादी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. भाजपने आपल्या नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 24 मंत्र्यांना स्थान दिलं आहे. ज्यातील 10 कॅबिनेट मंत्री आहेत तर 14 राज्यमंत्री. आता जातीय समीकरणानुसार मंत्र्यांची संख्या पाहा.

  • समुदाय                                      मंत्रिपदं
  • पटेल                                            07
  • OBC                                           07
  • ST (आदिवासी)                          04
  • SC                                              02
  • क्षत्रिय                                          02
  • ब्राह्मण                                         02
  • जैन                                             01

मंत्रिमंडळ बदलातील भाजपचं प्रांतीय समीकरण

बरं भाजपने जातीचं समीकरण साधताना, प्रांतांचं समीकरणंही अगदी योग्य साधलं आहे. निवडणुकीत प्रांत हा अस्मितेचा मुद्दा बनतो, आणि त्यावरुनच बऱ्याचदा उमेदवार विजयी वा पराभूत होतो. हेच भाजपने पक्क ओळखलं आहे, आणि आपल्या नव्या मंत्रिमंडळात गुजरातच्या सगळ्या प्रांतातील मंत्र्यांना स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरातचे एकूण 4 प्रांत आहे. सौराष्ट्र, उत्तर गुजरात, दक्षिण गुजरात, मध्य गुजरात. या चारही प्रांतातील आमदारांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं आहे.

  • प्रांत                                 मंत्र्यांची संख्या
  • सौराष्ट्र                                     08
  • उत्तर गुजरात                           03
  • दक्षिण गुजरात                         07
  • मध्य गुजरात                            06

आणखी खोलात जायचं असेल तर प्रांतनिहाय कुठल्या व्यक्तीला मंत्रिपद दिलं हे पाहावं लागेलं.

सगळ्यात आधी सुरुवात करुया उत्तर गुजरातपासून जिथल्या ऋषीकेश पटेल यांना मंत्रमंडळात स्थान मिळलंय, ते विसनगर मतदारसंघातून येतात आणि ते पटेल समुदायाचं प्रतिनिधित्त्व करतात. त्याच प्रांतातील प्रातिज मतदार संघातील ओबीसी आमदार आहेत गजेंद्र परमार, त्यांनाही मंत्रिपद मिळालं आहे. तर कांकरेज मतदारसंघात किर्तीसिंह वाघेला यांनाही मंत्रिमंडळात घेतलं गेलं आहे, ते क्षत्रिय समुदायातून येतात.

आता येऊया दक्षिण गुजरातकडे,

इथं तब्बल 6 मंत्रिपदं वाटण्यात आली आहे. गणदेवी मतदारसंघातून येणाऱ्या एससी समुदायाच्या नरेश पटेल यांना मंत्रिपद मिळालंय, तर त्यांच्याच बाजूच्या पारडी मतदारसंघातून ब्राह्मण समुदायाच्या कानू देसाई यांना संधी दिली आहे. आदिवासीं प्रतिनिधींनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे, कपराडा मतदारसंघातून जितू चौधरी हे मंत्री झालेत. तर मजुरा मतदारसंघातून हर्ष चौधरी यांना मंत्रिपद मिळालं आहे. ते मंत्रिमंडळातील एकटे जैन समुदायाचे मंत्री आहेत. तर कोळी पटेल समुदायातून मुकेश पटेल आणि पटेल समुदायातून विनू मोरडिया यांनाही मंत्रिपद मिळालं आहे.

आता सौराष्ट्राची परिस्थिती पाहा…

भाजपने इथं सर्वाधिक लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. सौराष्ट्रात पटेल समुदायाचा प्रभाव जास्त आहे, त्यामुळे या विभागातून तब्बल 4 मंत्रिपदं ही पटेलांना देण्यात आली आहेत. राजकोट मतदार संघातील अरविंद रयाणी, जामनगरमधील राघव पटेल, मोरबीमधील ब्रिजेश मेरज आणि भावनगर पश्चिममधून जितू वाघाणी हे मंत्रिमंडळात पाटिदार समाजाचं नेतृत्त्व करत आहेत. याशिवाय केशोदमध्ये देवा मालम आणि महुआ भावनगरमधल्या आर सी मकवाना या कोळी समुदायाच्या आमदारांनाही घेण्यात आलं आहे. किरीटसिंह राणा यांना खिंबडी मतदारसंघातून मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं आहे.

आता येऊया मध्य गुजरातकडे..

इथं SC, ST आणि OBC ची मोठी वोटबँक आहे. जी वोटबँक आधी काँग्रेस आणि सेक्युलर पक्षांना मतदान करत होती. या वोटबँकला लुभावण्याचा प्रयत्न भाजपने मंत्रिमंडळ विस्तारातून केला आहे. मध्य गुजरातला 6 मंत्रिपदं देण्यात आली आहेत, आणि ही सर्वच्या सर्व SC, ST आणि OBC समाजाचं नेतृत्त्व करणाऱ्या आमदारांना मिळाली आहेत. असरावामधून प्रदीप परमार यांना मंत्रिपद मिळालं आहे, ते एससी समाजाचं प्रतिनिधित्त्व करतात तर संतारापूरातून कुबेर डिंडोर, मोरवा हडफमधून निमिषा सुथार आणि वडोदऱ्यातून मनिषा वकील या आदिवासी प्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं हे. याशिवाय निकोलमधून जगदीश पांचाळ आणि महेमदाबादमधून अर्जुनसिंह राणा या ओबीसी नेत्यांनाही मंत्रिपद मिळालं आहे.

सरकारमध्ये पाटीदारांची पॉवर

काही वर्षांपूर्वी झालेल्या पाटीदार आंदोलनापासून भाजपने चांगलाच धडा घेतला आहे. आणि पाटिदार समाजाकडे आपलं लक्ष्य केंद्रित केलं आहे. त्यामुळेच नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 7 पटेल समुदायाच्या मंत्र्यांना स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्यासह अरविंद रैयाणी, जितू वाघाणी, विणू मोरडिया, राघव पटेल, ऋषिकेश पटेल, ब्रिजेश पटेल यांचा समावेश आहे. या मंत्रिमंडळात महिलांना मोठ्या प्रमाणात स्थान दिलं जाईल अशी चर्चा होती, मात्र अवघी 2 मंत्रिपदं महिलांच्या वाट्याला आली आहे. ज्यात वडोदऱ्यातून मनिषा वकील आणि मोरवा हडफमधून निमिषा सुथार यांना स्थान दिलंय, विशेष म्हणजे या दोघीही आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्त्व करतात.

संबंधित बातम्या:

गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक निर्णय, मुख्यमंत्रीच नाही तर स्पीकर, मंत्री सगळे बदलले, उपमुख्यमंत्री नितीन पटेलांनाही जागा नाही

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचं काम कधी पूर्ण होणार? नितीन गडकरींकडून हरियाणा, राजस्थानात कामाची पाहणी

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.