दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचं काम कधी पूर्ण होणार? नितीन गडकरींकडून हरियाणा, राजस्थानात कामाची पाहणी

देशाची राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या ग्रीन एक्स्प्रेस वेच्या कामाची पाहणी नितीन गडकरी यांच्याकडून केली जातेय. हा महामार्ग 1 लाख कोटी रुपये खर्च करुन पूर्ण केला जातोय. या महामार्गाचं काम 2023 पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे.

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचं काम कधी पूर्ण होणार? नितीन गडकरींकडून हरियाणा, राजस्थानात कामाची पाहणी
नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 1:59 PM

मुंबई: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दिल्ली-मुंबई ग्रीन एक्स्प्रेस वेच्या कामाची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांचा दौरा सुरु झाला आहे. नितीन गडकरी यांनी हरियाणा आणि राजस्थानमधील कामाची पाहणी केली. नितीन गडकरींनी सकाळी हरियाणामध्ये पाहणी केल्यानंतर राजस्थानमध्ये महामार्गाच्याकामाची हवाई पाहणी केली. या प्रकल्पामुळं दिल्ली ते मुंबई हे अंतर 12 तासात पूर्ण करता येणार आहे. हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतून महामार्ग जाईल. दिल्ली- मुंबई ग्रीन एक्स्प्रेस वे 1380 किलोमीटरचा आहे. असं गडकरी म्हणाले

2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार

देशाची राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या ग्रीन एक्स्प्रेस वेच्या कामाची पाहणी नितीन गडकरी यांच्याकडून केली जातेय. हा महामार्ग 1 लाख कोटी रुपये खर्च करुन पूर्ण केला जातोय. या महामार्गाचं काम 2023 पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. या महामार्गाचं काम तीन राज्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात काही ठिकाणी काम थांबलं होत. मात्र, आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम महामार्गाचं करण्यात येत आहे.

देशातील सर्वात लांबीचा एक्स्प्रेस वे

दिल्ली ते मुंबई हा 1380 कि.मीचा एक्स्प्रेस वे हा देशातील सर्वात लांबीचा एक्स्प्रेस वे असेल. या महामार्गामुळं दिल्ली ते मुंबई अंतर 130 किलोमीटरनं कमी होईल. तर, नवी दिल्ली ते मुंबई यामार्गात येणाऱ्या शहरांना जोडलं जाईल. दिल्ली, फरिदाबाद, सोहना, जयपूर शहरांना जोडलं जाईल.

दोन टप्पे 2022 पर्यंत सुरु होणार

दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वे वरील दोन टप्पे दिल्ली-दौसा- लस्लोट हा भाग दिल्ली जयपूर एक्स्प्रेस वेचा बाग आहे आणि वडोदरा आणि अंकलेश्वर हे दोन टप्पे मार्च 2022 पर्यंत सुरु करण्यात येणार आहेत. तर, संपूर्ण एक्स्प्रेस वे मार्च 2023 पर्यंत सुरु करण्यात येईल. 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांनी या कामाचा शुभारंभ केला होता. 1380 किलोमीटर पैकी 1200 किमीच्या काम ठेकेदारांना देण्यात आलं आहे. त्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

8 पदरी लेन दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे हा एकूण 8 लेन चा असेल. त्यातील 4 लेनचं काम अगोदर पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील 4 लेन बनवल्या जातील, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. दिल्ली ते दौसा 220 किमीचं काम मार्च 2022 पर्ण होईल, असं नितीन गडकरी म्हणाले. हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 5 राज्यांतून एक्स्प्रेस वे जाईल. दिल्ली गुरुग्राम मेवात कोटा रतलाम गोदरा वडोदरा सुरत दहिसर मार्गे मुंबईत दाखल होईल.

इतर बातम्या:

माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ

महामारीच्या काळातही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, 14 लाख कोटींच्या कर्जाचे वितरण

Nitin Gadkari take review of work of Delhi Mumbai Express way in Haryana and Rajasthan

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.