Polling Booth Search : मतदान केंद्रच सापडेना? मग करा की हा उपाय

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी अनेक जण पहिल्यांदाच मतदान करत आहेत. त्यामुळे त्यांच्यात अभूतपूर्व उत्साह आहे. तुमचे मतदान केंद्र कोणते आहे हे अनेकदा लक्षात येत नाही. उत्साहाच्या भरात आपण भलत्याच केंद्रावर जातो. तेव्हा या पद्धतीने तुमचे मतदान केंद्र हुडकता येते.

Polling Booth Search : मतदान केंद्रच सापडेना? मग करा की हा उपाय
असे शोधा मतदान केंद्र
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 6:33 PM

उद्यापासून भारतीय लोकशाहीचा उत्सव सुरु होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होत आहे. Lok Sabha Election 2024 मध्ये मतदानाचा हक्का बजावण्यासाठी तुमच्या घराजवळील मतदान केंद्र कोणते हे तुम्हाला पण सहज माहिती करता येते. जर तुमचे मतदान केंद्र कोणते आहे हे माहिती नसेल, तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्याची माहिती करुन घ्या. तुमचे मतदान केंद्र कोणते आहे, हे माहिती करुन घेण्यासाठी दोन पद्धती आहेत.

Voter Helpline App: ॲपच्या माध्यमातून माहिती करुन घ्या मतदान केंद्र

  1. सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी निवडणूक आयोगाने हे मोबाईल ॲप तयार केले आहे. हे मोबाईल ॲप अँड्राईड आणि आयओएस या दोन्ही युझर्ससाठी उपलब्ध आहे.
  2. सर्वात अगोदर तुम्ही मोबाईलमध्ये वोटर हेल्पलाईन ॲप, गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करुन घ्या. ॲप्पल युझर्स त्यांच्या स्टोअरमधून हे ॲप डाऊनलोड करु शकतील. ॲप उघडल्यावर तुम्ही लॉगिन न होता पण तुमचे मतदान केंद्र हुडकू शकता.
  3. हे सुद्धा वाचा
  4. ॲप उघडताच तुम्हाला स्किप हा पर्याय दिसेल. त्यावर तुम्ही क्लिक केल्यावर या ॲपवर तुम्हाला सर्व पर्याय दिसतील. तुमचे जवळचे मतदान केंद्र ओळखण्यासाठी ॲपमध्ये सर्वात वरील भागातील Search Your Name in Electoral Roll वर क्लिक करा.

वोटर हेल्पलाईन ॲप

हा पर्याय निवडल्यावर तुमच्यासमोर अनेक पर्याय उघडतील. त्यात सर्च बाय मोबाईल, सर्च बाय बार/क्यूआर कोड, सर्च बाय डिटेल्स आणि सर्च बाय EPIC No असे पर्याय दिसतील. EPIC नंबर हा तुमचा Voter ID Card क्रमांक असतो.

Polling Station Online Search : ही सरकारी साईट करेल मदत

  • जर तुम्ही मोबाईलमध्ये Voter Helpline App डाऊनलोड केले नसेल तरी काही हरकत नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण मतदान केंद्राची माहिती मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला https://electoralsearch.eci.gov.in/ या सरकारी संकेतस्थळावर जावे लागेल.
  • electoralsearch.eci.gov.in या साईटवर गेल्यावर तुमचे मतदान केंद्र माहिती करुन घेण्यासाठी तुम्हाला Search by EPIC, Search by Details आणि Search by Mobile असे तीन पर्याय मिळतील. सर्च बाय ईपीआयसी या पर्यायात तुम्हाला मतदान कार्ड क्रमांक टाकावा लागेल. तर दुसरा पर्यायात, तुम्हाला विचारलेला तपशील भरावा लागेल. तिसरा पर्याय हा सर्च बाय मोबाईल असा आहे. यामध्ये तुमच्या मतदान कार्डशी संबंधित मोबाईल क्रमांक तुम्हाला येथे टाकावा लागेल.
Non Stop LIVE Update
ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब
ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब.
या निवडणुकीत काय होणार? ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; दादा काय म्हणाले
या निवडणुकीत काय होणार? ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; दादा काय म्हणाले.
या नशेडी व्यवस्थेत एका आमदाराचा मुलगा होता, नाना पटोलेंचा रोख कुणावर?
या नशेडी व्यवस्थेत एका आमदाराचा मुलगा होता, नाना पटोलेंचा रोख कुणावर?.
सुप्रिया सुळेंमुळे लोक पक्ष सोडताय, तरुण महिला नेत्याचे गंभीर आरोप
सुप्रिया सुळेंमुळे लोक पक्ष सोडताय, तरुण महिला नेत्याचे गंभीर आरोप.
'ससून'च्या रक्त चाचणी विभागातील एका कर्मचाऱ्यानं ठोकली धूम, कारण...
'ससून'च्या रक्त चाचणी विभागातील एका कर्मचाऱ्यानं ठोकली धूम, कारण....
शिंदे जाणार? राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार?संजय शिरसाटांच उत्तर काय?
शिंदे जाणार? राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार?संजय शिरसाटांच उत्तर काय?.
बापाची जिद्द कायम, इयत्ता 10 वीत 10 वेळा नापास, पण 11 व्या प्रयत्नात..
बापाची जिद्द कायम, इयत्ता 10 वीत 10 वेळा नापास, पण 11 व्या प्रयत्नात...
400 पार की तडीपार? महायुतीला किती जागा? अनिल थत्तेंची भविष्यवाणी काय?
400 पार की तडीपार? महायुतीला किती जागा? अनिल थत्तेंची भविष्यवाणी काय?.
माथेरानला जाण्याच प्लान करताय? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, येत्या ऑगस्ट
माथेरानला जाण्याच प्लान करताय? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, येत्या ऑगस्ट.
रेमलचा मान्सूनवर परिणाम नाही, 'या' तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल
रेमलचा मान्सूनवर परिणाम नाही, 'या' तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल.