अब की बार 400 पार, आणखी एका एक्झिट पोलमध्ये भाजपला 400 जागा
News24 Today's Chanakya Exit Poll: 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सर्वात अचूक एक्झिट पोल देणाऱ्यांपैकी एक चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला ४०० जागा मिळताना दिसत आहे. त्यामुळे एनडीए सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करणार आहे.

News24 टुडेच्या चाणक्य एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील NDA ला मोठा विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा खरी ठरताना दिसत आहे. या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 400 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, भाजप 370 जागांपासून लांब असल्याचं दिसत आहे. एक्झिट पोलनुसार 543 लोकसभेच्या जागांपैकी भाजपला 335 जागा मिळू शकतात. त्यापैकी 15 जागा वाढू किंव कमी होऊ शकतात. तर एनडीएला 400 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर विरोधी इंडिया आघाडीला 107 जागा (+/- 11) आणि काँग्रेसला 50 जागा (+/- 11) मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना 36 जागा मिळू शकतात.
2019 आणि 2024 लोकसभा निवडणुकांचे निकाल
लोकसभा निवडणूक 2014 च्या निकालात NDA ला 336 जागांवर मोठा विजय मिळाला होता. तर UPA फक्त 60 जागांवर मर्यादित होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात NDA ला 353 जागा मिळाल्या होत्या. तर UPA ला फक्त 93 जागा मिळाल्या. दोन्ही वर्षात भाजपला पूर्ण बहुमत मिळाले होते.
बिहारमध्ये एनडीएला 36 जागा मिळत असल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. तर विरोधी इंडिया आघाडीला 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना 0 किंवा 1 जागा मिळण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेशातील 3 ते 4 जागा भारतीय जनता पक्षाला मिळताना दिसत आहे. इथेही काँग्रेसचा सुपडा साफ होताना दिसत आहे.
महाराष्ट्रात महायुती आणि महाविकासआघाडीत चुरशीची लढत होणार आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजपला 48 जागांपैकी 33 जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला 14 तर इतरांना 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेससाठी मोठा झटका बसू शकतो. कारण येथे भारतीय जनता पक्ष राज्यातील सर्व 29 जागा जिंकू शकतो. 2019 मध्ये देखील भाजपला राज्यातील फक्त छिंदवाडा या एका जागेवर पराभवाचा सामना करावा लागला होता.
झारखंडमध्ये भाजपला 14 पैकी 12 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 2 जागा मिळू शकतात.
हरियाणात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे. येथे 10 जागांवर भाजपला 6 तर काँग्रेसला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील 7 जागांपैकी 6 जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. येथे एका जागेचं भाजपला नुकसान होताना दिसत आहे.
एनडीए भारताच्या ईशान्येकडील राज्य आसाममध्ये मोठा विजय मिळवताना दिसत आहे. येथे भाजपला 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला फक्त 1 जागेवर समाधान मानावे लागू शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गुजरातमध्ये भाजपची कामगिरी 100 टक्के दिसत आहे. चाणक्य एक्झिट पोलमध्ये भाजपला येथील सर्व 26 जागांवर विजय मिळताना दिसत आहे.
