AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loksabha Exit Poll 2024 : या दोन राज्यात भाजपला लागणार लॉटरी, काँग्रेसचा सुपडा साफ

Loksabha ecit poll : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. पण त्याआधी आलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला मोठा फायदा होताना दिसत आहे. देशात एनडीएचे सरकार येणार असल्याचं दिसतं आहे. पण दोन अशी राज्य आहेत जिथे भाजपला लॉटरी लागणार आहे.

Loksabha Exit Poll 2024 : या दोन राज्यात भाजपला लागणार लॉटरी, काँग्रेसचा सुपडा साफ
| Updated on: Jun 01, 2024 | 9:08 PM
Share

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी आलेल्या एक्झिट पोलमध्ये देशात नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याची मोहर लागली आहे. एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या शक्यतेनुसार भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला देशात 300 ते 350 जागा मिळतील अंदाज वर्तवण्यात आला आहे. दैनिक भास्करच्या सर्वेक्षणात एनडीएला 281 ते 350 जागा तर इंडिया आघाडीला 145 ते 201 जागा मिळतील. तसेच इतरांना 33 ते 49 जागा मिळू शकतात. जन की बातच्या सर्वेक्षणात एनडीएला ३६२ ते ३९२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार एनडीएला 353 पैकी 383 जागा मिळू शकतात. INDIA Alliance ला 152 ते 182 जागा मिळू शकतात.

जन की बात सर्वेक्षणानुसार, INDIA Alliance ला 141 ते 161 जागा, न्यूज नेशनच्या सर्वेक्षणानुसार एनडीएला 342 ते 378 जागा मिळू शकतात. सर्वेक्षणात INDIA Alliance ला 153 ते 169 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. इतरांना 21 ते 23 जागा मिळतील. रिपब्लिक भारत-मॅट्रिक्सच्या सर्वेक्षणानुसार एनडीएला 368 जागा मिळतील आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला केवळ 125 जागा मिळतील असा अंदाज आहे.

इंडिया न्यूज-डी डायनॅमिक्सने देखील त्याच्या सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला एक्झिट पोलमध्ये ३७१ जागा मिळातील असा अंदाज वर्तवला आहे. INDIA Alliance ला 125 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना 47 जागा मिळू शकतात. स्कूल ऑफ पॉलिटिक्सने एनडीए 400 च्या पुढे जाऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी एनडीएला ३६७ ते ४०३ जागा मिळू शकतात असा दावी केला आहे. तर इंडिया आघाडीला केवळ 129 ते 161 जागा मिळू शकतात. भाजपच्या एनडीए आघाडीला उत्तर प्रदेशात 58 ते 66 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

या दोन राज्यांत भाजपला लॉटरी?

सर्वेक्षणानुसार ओडिशात भाजपला मोठी आघाडी मिळण्याचे संकेत आहेत. ओडिशात भाजपला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील एकूण जागा केवळ 22 आहेत. तर काँग्रेस आणि बीजेडीला फक्त 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. बंगालबद्दल सर्व्हेनुसार भाजपला फायदा होताना दिसत आहे. भाजपला बंगालमध्ये २१ जागा मिळण्याची शक्यता आहे. स्कूल ऑफ पॉलिटिक्स व्यतिरिक्त, इतर काही सर्वेक्षणांमध्ये ही असे भाकित करण्यात आले आहे. 2019 मध्ये भाजपला येथून 18 जागा मिळाल्या होत्या. पण आता २१ ते २२ जांगाचा  अंदाज आहे. सर्वेक्षणानुसार 11 राज्यांमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ होताना दिसत आहे. गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडसारख्या राज्यांमध्ये भाजप क्लीन स्वीप करत आहे.

न्यूज नेशनच्या एक्झिट पोलनुसार देशात एनडीएला 342 ते 378 जागा मिळू शकतात. तर INDIA Alliance ला फक्त 153 ते 169 जागा देण्यात आल्या आहेत. भाजपला उत्तर प्रदेशात 65 जागांचा अंदाज आहे. तर मित्रपक्षांना 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएचे महाराष्ट्रात मोठे नुकसान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. येथे सर्वेक्षणात केवळ २७ जागा भाजप आणि मित्रपक्षांच्या वाट्याला गेल्या आहेत. तर इंडिया आघाडीला येथे २१ जागा मिळू शकतात.

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी तरुणाला मारहाण.
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक.
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया.
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?.
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर.
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान.
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने...
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने....
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी.
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!.
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?.