AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील 20 आमदार थेट राष्ट्रपतींना भेटणार, कारण काय?; दिल्लीत मोठ्या घडामोडी?

राजकीय दृष्ट्या आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यातील 20 आमदार आज थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. आज सकाळी ही भेट होत आहे. आमदारांनी अचानक राष्ट्रपतींना भेटण्याचा निर्णय घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राज्यातील 20 आमदार थेट राष्ट्रपतींना भेटणार, कारण काय?; दिल्लीत मोठ्या घडामोडी?
narhari zirwalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 04, 2023 | 8:38 AM
Share

संदीप राजगोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी आणि मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाली. ही घटना ताजी असतानाच आणखी एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. राज्यातील 20 आमदार आज थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. राज्यातील 20 आमदार राष्ट्रपतींना भेटत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमागचे कारण काय? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

राज्यातील सर्वपक्षीय 20 आमदार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनात ही भेट होईल. त्यानंतर ही 20 आमदार दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन भेटीमागचं कारण स्पष्ट करतील. तसेच या पत्रकार परिषदेतून अत्यंत महत्त्वाची माहितीही दिली जाणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्यामुळे झिरवळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भेटीमागचं कारण काय?

राज्यातील हे 20 आमदार राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. आदिवासी समाजासाठी काही ठोस निर्णय घेण्याची मागणी या भेटीत केली जाणार असल्याचं सांगण्यात येतं. राज्यात धनगर समाजाला आदिवासींच्या प्रमाणे आरक्षणाची मागणी वाढत असताना या भेटीला महत्त्व आलं आहे. राज्यात एकीकडे आरक्षणाचा मुद्दा तापत असताना या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या भेटीत आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा होऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना भेटणारे आमदार

1) नरहरी झिरवळ, विधानसभा उपाध्यक्ष 2) विजयकुमार गावित, मंत्री 3) धर्मराव बाबा आत्राम, मंत्री 4) सुनील भुसारा, आमदार 5) नितीन पवार, आमदार 6) दौलत दरोडा, आमदार 7) किरण लहमटे, आमदार 8) हिरामण खोसकर, आमदार 9) शांताराम मोरे, आमदार 10) सहस्रम करोटे, आमदार 11) शिरीशकुमार नाईक, आमदार 12) श्रीनिवास वनगा, आमदार 13) अशोक उईके, आमदार 14) कांशीराम पावरा, आमदार 15) देवराम होली, आमदार 16) कृष्णा गजभिये, आमदार 17) दिलीप बोरसे, आमदार 18) राजेश पडवी, आमदार 19) के सी पडवी, आमदार 20) आमशा पडवी, आमदार

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.