AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खुनी सरकार! सरकारी रुग्णालयेच मृत्युशय्येवर…; नांदेडमधील रुग्णमृत्यू प्रकरणावरून सामनातून सरकारवर टीका

Saamana Editorial on Nanded Civil Hospital Death Case News : आरोग्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा घ्यावा, एवढी तरी नीतिमत्ता मिंध्यांकडे उरलीय काय?; सामनातून शिंदे सरकारवर टीकास्त्र

खुनी सरकार! सरकारी रुग्णालयेच मृत्युशय्येवर...; नांदेडमधील रुग्णमृत्यू प्रकरणावरून सामनातून सरकारवर टीका
| Updated on: Oct 04, 2023 | 8:01 AM
Share

मुंबई | 04 सप्टेंबर 2023 : नांदेडच्या सरकारी रुग्णालयात एकाच दिवशी 24 रूग्णांचा मृत्यू झाला. यावरून संतप्त प्रतिक्रिया आल्या. अशातच काल म्हणजे दुसऱ्या दिवशी 7 रूग्णांचा मृत्यू झाला. या मृतकांमध्ये नवजात बालकांचाही समावेश आहे. यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही यावर भाष्य करण्यात आलं आहे. या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे. ‘खुनी सरकार! सरकारी रुग्णालयेच मृत्युशय्येवर…’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यात शिंदे सरकारवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे.

सामना अग्रलेख जसाच्या तसा

रुग्णकांडातील बळी म्हणजे सरकारने केलेले अप्रत्यक्ष खूनच आहेत व त्यासाठी या खुनी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा! या सरकारमध्ये जराशीही माणुसकी व लोकभावनेची चाड उरली असेल तर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला पाहिजे. मिंध्यांकडे एवढी तरी नीतिमत्ता उरली आहे काय?

महाराष्ट्रात सरकार नावाची चीज शिल्लक राहिली आहे काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी मृत्युकांडे महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. औषधांच्या तुटवड्यामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या मृत्यूचे सत्रच सुरू आहे. महिनाभरापूर्वी ठाण्यात आणि आता नांदेड व छत्रपती संभाजीनगरात जे भयंकर रुग्णकांड झाले, ते अत्यंत वेदनादायक व संतापजनक आहे. देशातील सर्वात प्रगत राज्य, असे बिरुद अभिमानाने मिरवणाऱया महाराष्ट्राची मान आज शरमेने खाली झुकली आहे. महाराष्ट्रात निपजलेल्या सत्तापिपासू मिंध्यांच्या गलथानपणामुळे किडे-मुंग्या मराव्यात त्या पद्धतीने सरकारी रुग्णालयांत मृत्यूचे तांडव सुरू आहे.

महिनाभरापूर्वी ठाण्यातील कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा अचानक मृत्यू झाला. त्या घटनेची चौकशी होत नाही, तोच मागील दोन दिवसांत मराठवाड्यात 53 रुग्णांचा शासकीय रुग्णालयांमध्ये बळी गेला. होय, हे बळीच आहेत! याला नैसर्गिक मृत्यू म्हणताच येणार नाही.

नांदेडच्या शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या शासकीय रुग्णालयात तर दोन दिवसांत 35 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. या 35 पैकी 16 बळी तर नवजात अर्भकांचे आहेत. सोमवारी 24 जणांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या दुसऱयाच दिवशी नांदेड रुग्णालयात आणखी 11 जणांचा व छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयातही मंगळवारी 18 जणांचा बळी गेला. नांदेडमध्ये तर ज्या मुलांनी अजून हे जगही पाहिले नाही अशा 16 कोवळ्या कच्च्याबच्च्यांना काही कळण्याआधीच या जगाचा निरोप घ्यावा लागला. कोण आहे या मृत्यूंना जबाबदार? राज्यातील आरोग्य यंत्रणा रामभरोसे सोडून 24 तास मलईच्या मागे धावणाऱया राज्यातील घटनाबाह्य सरकारला याचा जाब द्यावाच लागेल.

नांदेडच नव्हे, तर राज्यातील रुग्णालयांत सध्या औषध खरेदी ठप्प असल्यामुळे हेच घडते आहे. ही खरेदी नेमकी आहे, याचे प्रामाणिक उत्तर राज्यातील ‘एक फुल दोन हाफ’ सरकार देऊ शकेल काय? खासगी रुग्णालयातील औषधोपचार परवडत नाहीत म्हणून तर गोरगरीब जनता सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येत असते. मात्र सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे विकत आणण्यासाठी पिटाळले जाते तेव्हा सरकारी रुग्णालयांत जीव वाचविणारी महत्त्वाची औषधे उपलब्ध नाहीत याची खात्री पटते. हे खरे असेल तर राज्यातील माणुसकीशून्य सरकारने एका अर्थाने रुग्णांचे पाडलेले हे खूनच आहेत, असे कुणी म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरविता येणार नाही.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.