भाजपचे खासदार, मंत्री गुरुवारी पंतप्रधानांना भेटणार, पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची मागणी करणार

महाराष्ट्राच्या काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आर्थिक मदत मिळावी म्हणून भाजपचे काही खासदार आणि मंत्री गुरुवारी पंतप्रधानांना भेटणार आहेत. (sanjay patil)

भाजपचे खासदार, मंत्री गुरुवारी पंतप्रधानांना भेटणार, पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची मागणी करणार
sanjaykaka patil
समीर भिसे

| Edited By: भीमराव गवळी

Jul 27, 2021 | 3:29 PM

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आर्थिक मदत मिळावी म्हणून भाजपचे काही खासदार आणि मंत्री गुरुवारी पंतप्रधानांना भेटणार आहेत. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी यांनी त्याबाबतची माहिती दिली. तसेच राज्याला भरीव मदत करण्यात यावी यासाठी पंतप्रधानांना आजच पत्रं लिहिल्याचंही संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केलं. (maharashtra mp to meet pm narendra modi over relief package for flood affected maharashtra)

संजयकाका पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. आम्ही काही मंत्री आणि खासदार पंतप्रधानांना भेटणार आहोत. त्यांच्याकडे गुरुवारी भेटण्याची वेळ मागितली आहे. पंतप्रधानांना भेटून राज्यातील पूरस्थिती आणि कोरोनाच्या परिस्थितीची माहिती त्यांना देण्यात येईल. तसेच राज्याला तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणीही त्यांच्याकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती संजयकाका पाटील यांनी दिली.

राजकारण करण्याची वेळ नाही

शिवसेना नेते संजय राऊत काय म्हणतात त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. केंद्र सरकार मदत करणारच आहे. पण सर्वात आधी पूरग्रस्तांना मदत करणं हे राज्याचं दायित्व आहे. मात्र, ही वेळ राजकारण करण्याची नाही. गुरुवारी आम्ही पंतप्रधानांची वेळ मागितली आहे. आम्ही पंतप्रधानांना भेटून आर्थिक मदतीचं आवाहन करणारच आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संरक्षक भिंतीचा उपयोग होणार नाही

राज्य सरकार नद्यांभोवती संरक्षक भिंत बांधणार असल्याचं ऐकून आहे. पण अशी भिंत बांधून काहीही उपयोग होणार नाही. त्याबाबत माझ्या मनात शंका आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद आणि सोलापूर येथे पाणी वळवण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर काम करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

सांगलीत कोविड परिस्थिती गंभीर

सांगलीत कोविडची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सांगलीमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे. त्याची माहितीही पंतप्रधानांना देऊ, असं ते म्हणाले. (maharashtra mp to meet pm narendra modi over relief package for flood affected maharashtra)

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘वाढदिवसाची भेट काय देणार?’, भास्कर जाधवांकडून ‘स्वच्छ-सुंदर’ उत्तर!

VIDEO: राज्यपाल नेहमीच घटनेचं पुस्तक चाळूनच काम करतात, पुस्तक पुरात वाहून गेलं का पाहावं लागेल; संजय राऊत संतापले

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका : राज ठाकरे

(maharashtra mp to meet pm narendra modi over relief package for flood affected maharashtra)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें