मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Thane) यांनी ठाणे दौरा करुन मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी पूरस्थितीवर (Maharashtra flood) भाष्य केलं.

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका : राज ठाकरे
raj thackeray-uddhav thackeray

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Thane) यांनी ठाणे दौरा करुन मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी पूरस्थितीवर (Maharashtra flood) भाष्य केलं. नियोजनशून्य कारभारामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.

पूरग्रस्तांना प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने मदत करत आहे. मनसेच्यावतीने देखील त्या त्या भागात मदतकार्य सुरू आहे. मदतकार्य महत्वाचे आहे. नुसती पाहणी करून काहीही अर्थ नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

नियोजन नाही, त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. महापूर हा काही पहिल्यांदाच आलाय असं नाही. नुसते रस्ते वाढत आहे, त्याला आकार नाही. नियोजन पहिले महत्वाचे आहे. ठाणे शहराची परिस्थिती वेगळी नाही. मी लहान असताना ठाणे शहर कसे होते आणि आता कसे आहे हे पाहतोय. टाऊन प्लॅनिंग नाही. त्यामुळे आशा परिस्थिती उद्भ्वत आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसावर भाष्य केलं.

राज ठाकरे यांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना आणि सल्ले

  1. – सोशल मीडियाचा वापर कमी करा
  2. – स्थानिक पत्रकारांना धरुन राहा, तुमच्या कार्यक्रमाची दखल त्यांना करून द्या, असे कार्यक्रम करा की स्थानिक पत्रकार देखील तुमच्यावर खुश असतील.
  3. – प्रभाग अध्यक्ष पद रद्द करणार, प्रभाग अध्यक्षपदी दुसरा पर्याय देणार – पुण्यात जसा पर्याय निवडला तसाच ठाण्यात निवडणार
    – 25 दिवसांनी ठाण्यात देखील पर्याय निवडणार
  4. – निवडणुकीच्या तयारीला लागा
  5. – ठाणे महानगरपालिकेत 130 नगरसेवक आहेत, तेवढेच वार्ड शाखाध्यक्ष मला पाहिजेत. जास्त वाढवत बसू नका. शाखा अध्यक्ष हाच पक्षाचा कणा आहे.
  6. – अजून एकमेकांशी हेवेदावे करू नका, एकमेकांशी जोडून राहा. जे नवीन येथील जे तिकिटासाठी येत असतील त्यांनी तिकीटासाठी घेऊ नका पक्षबांधणी करा.
  7.  नव्याने आणि जुन्यांनी एकमेकांशी वाद करायचा नाही. मनसे पक्ष कसा बळकट होईल यासाठी त्याचा विचार करा त्याच्यासाठी मेहनत करा

संबंधित बातम्या 

बॅग भरुन कपडे आणा, राज ठाकरेंचे मुंबईतील पदाधिकाऱ्यांना आदेश, ठाण्यावरुन आजच पुण्याला निघणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI