महाराष्ट्रातील तरुण उद्योगपतीची तिरुपती बालाजी देवस्थानच्या विश्वस्तपदी नेमणूक

आंध्र प्रदेशमधील (Andhra Pradesh) प्रसिध्द देवस्थान तिरुपती बालाजी देवस्थानच्या विश्वस्तपदी (Tirumala Tirupati Devasthan Trustee) महाराष्ट्राच्या तरुण उद्योगपतीची नेमणूक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील तरुण उद्योगपतीची तिरुपती बालाजी देवस्थानच्या विश्वस्तपदी नेमणूक

हैदराबाद: आंध्र प्रदेशमधील (Andhra Pradesh) प्रसिध्द देवस्थान तिरुपती बालाजी देवस्थानच्या विश्वस्तपदी (Tirumala Tirupati Devasthan Trustee) महाराष्ट्राच्या तरुण उद्योगपतीची नेमणूक करण्यात आली आहे. तिरुपती विश्वस्त मंडळाने उद्योजक अमोल काळे (Maharashtrian Businessman Amok Kale on TTD Trust) यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती केली. तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या (Tirupati Temple) विशेष अधिकारी ए. व्ही. धर्मा रेड्डी यांनी अमोल काळेंना विशेष निमंत्रित सदस्यपदाची शपथ दिली.

आंध्र प्रदेश सरकारने अमोल काळे यांच्यासोबत इतर 6 सदस्यांचीही नियुक्ती केली आहे. त्यांना देखील सोमवारी (23 सप्टेंबर) देवस्थानच्या सदस्यपदाची शपथ देण्यात आली. अमोल काळे हे स्थानिक सल्लागार समिती, मुंबईच्या (महाराष्ट्र) अध्यक्षपदी देखील असणार आहेत.

तिरुपती बालाजी देवस्थान भारतातील प्रसिध्द देवस्थान आहे. येथे मोठ्या प्रमाणावर भाविक तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी येतात. तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्ट (तिरुमला) ही देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी धार्मिक विश्वस्त संस्था म्हणून ओळखली जाते. या विश्वस्त संस्थेच्या निमंत्रित सदस्यपदी महाराष्ट्रातील सदस्य म्हणून अमोल काळे यांची नियुक्ती होणे विशेष महत्वाचे मानले जात आहे.

भाजपचा या नियुक्त्यांना विरोध

आंध्रप्रदेश सरकारने 28 सदस्य आणि 7 निमंत्रित सदस्यांची तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती केली आहे. मात्र, भाजपच्या चित्तूर विभागाने या नियुक्त्यांना विरोध करत आंध्र प्रदेशमधील वाय. एस. जगमोहन रेड्डी सरकारला नियुक्त्या रद्द करण्याची मागणी केली आहे.

भाजपचे नेते आणि तिरुपती देवस्थान विश्वस्त मंडळाचे माजी सदस्य जी. भानू प्रकाश रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले, “जर जगमोहन रेड्डी यांना मोठं विश्वस्त मंडळ नेमायचं असेल तर त्यांनी स्वतःच्या मंदिरावर ते नेमावं तिरुमाला तिरुपती देवस्थानावर नाही. तिरुपती देवस्थान मंडळावर राजकीय बेरोजगार लोकांची नेमणूक करु नये. देवावर श्रद्धा असणारे अनेक चांगले लोक येथे आहेत.”

वादग्रस्त उद्योगपतीचीही नियुक्ती

तिरुपती देवस्थान विश्वस्त मंडळावर चेन्नईच्या शेखर रेड्डी या उद्योगपतीच्या नियुक्तीला राजकीय वर्तुळातून सर्वाधिक विरोध झाल्याचं पाहायला मिळालं. नोटबंदीनंतर शेखर रेड्डी यांना मोठ्या रकमेच्या 2000 रुपयांच्या नव्या नोटांसह पकडण्यात आलं होतं. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंनी रेड्डी यांना तात्काळ विश्वस्त मंडळावरुन हटवलं होतं. मात्र, मुख्यमंत्री जगमोहन यांनी नव्या विश्वस्त मंडळात या रेड्डी यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. सध्या शेखर रेड्डी यांना संबंधित सर्व आरोपातून मुक्त करण्यात आलेलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *