AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाकुंभच फ्लाइट तिकीट अव्वाच्या सव्वा किंमतीला, त्यापेक्षा लंडनला जाणं स्वस्त, एरवी 5 हजाराच तिकीट आता…

Prayagraj Flight Ticket Price : महाकुंभ मेळ्यामुळे प्रयागराज देशभरातून येणाऱ्या भाविकांच केंद्र बनला आहे. मोठ्या संख्येने लोक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. सध्या प्रयागराजच्या विमान तिकीटाचे दर तुम्ही पाहिले, तर तुमचे डोळे विस्फारतील. प्रयागराजपेक्षा परदेशात जाण्याच विमान तिकीट स्वस्त आहे. मुंबईहून प्रयागराजच्या विमान तिकीटाचे दर पाहिले, तर तुमचे डोळे विस्फारतील.

महाकुंभच फ्लाइट तिकीट अव्वाच्या सव्वा किंमतीला, त्यापेक्षा लंडनला जाणं स्वस्त, एरवी 5 हजाराच तिकीट आता...
Prayagraj Flight Ticket Price
| Updated on: Jan 29, 2025 | 11:27 AM
Share

प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात आज मौनी अमावस्येचा दिवस आहे. बुधवारी रात्री उशिरा इथे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत जवळपास 20 नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. या महापर्वात आज म्हणजे बुधवारी शाही स्नानासाठी जवळपास 10 कोटी लोक पोहोचण्याची शक्यता आहे. प्रयागराज येथे मोठ्या संख्येने भाविक जमले आहेत. लोक बस, ट्रेन्स आणि फ्लाइटने महाकुंभसाठी येत आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण आज प्रयागराजला येणाऱ्या विमान तिकीटांचे दर 10 पटीने वाढले आहेत.

एरवी प्रयागराजच्या विमान तिकीटाचा दर 5 हजार रुपये आहे. पण आता महाकुंभसाठी इथे जाणाऱ्या विमान तिकीटाचा दर 30 ते 50 हजार रुपये आहे. इंटरेस्टिंग बाब म्हणजे सध्या दिल्ली ते लंडन तिकीटाचे दर 30 ते 37 हजार रुपये आहे. इंडोनेशियाच्या तिकीटाचा दर 27 हजार रुपये आहे. मलेशियाला जाणाऱ्या विमान तिकीटाचा दर 10 ते 15 हजार रुपये आहे. म्हणजे प्रयागराजला जाण्यापेक्षा परदेश प्रवास जास्त स्वस्त आहे.

प्रचंड तिकीट दर

विमानाने जाऊ इच्छिणाऱ्या अनेक प्रवाशांनी DGCA कडे प्रयागराजच्या विमान तिकीट दरांची तक्रार केली आहे. DGCA ने 27 जानेवारीला एअरलाइन्स कंपन्यांना प्रयागराजच्या विमान तिकीटांचे दर वाढवू नका असं सांगितलं आहे. सध्या देशाच्या विविध शहरातून प्रयागराजसाठी 132 उड्डाणं सुरु आहेत. स्पाइसजेटने फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी, बंगळुरु, अहमदाबाद, मुंबई, जयपूर आणि हैदराबाद येथून प्रयागराजसाठी नवीन उड्डाण सुरु करण्याची तयारी केली आहे. यामुळे वाढती मागणी पूर्ण व्हायला मदत होईल. तिकीटाचे दर थोडे कमी होतील अशी अपेक्षा आहे. महाकुंभ दरम्यान भाविकांना दिलासा देण्यासाठी सरकार आणि एअर लाइन्स मिळून काम करत आहेत. जेणेकरुन प्रवास थोडा सुलभ होईल.

मुंबई-प्रयागराज विमान तिकीटाचे दर किती?

जर तुम्हाला दिल्ली, बंगळुरु किंवा चेन्नई सारख्या शहरातून लंडन, बाली, मलेशिया, दुबई, मालदीव आणि थायलंडला जायच असेल, तर महाकुंभपेक्षा स्वस्त विमान तिकीट पडेल. सध्या दिल्ली-प्रयागराज विमान तिकीटाचे दर 50 हजार रुपये. मुंबई-प्रयागराज तिकीटाचे दर 60 हजार रुपये, जयपूर-प्रयागराज तिकीटाचे दर 26 हजार रुपये, हैदराबाद-प्रयागराज 54 हजार रुपये, बंगळुरु-प्रयागराज 70 हजार रुपये, कोलकाता-प्रयागराज 27 हजार रुपये, अहमदाबाद-प्रयागराज 54 हजार रुपये, भुवनेश्वर-प्रयागराज 49 हजार रुपये, रायपुर-प्रयागराज 48 हजार रुपये विमान तिकीटाचे दर आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.