
IndiavsPakistan: भारत आणि पाकिस्तानमधील वाढता संघर्ष आता केवळ सीमाप्रश्न राहिलेला नसून त्याचा परिणाम आशियाच्या अनेक भागांवर दिसू लागला आहे. तांदूळ, कांदा आणि अन्य आवश्यक वस्तू तणवग्रस्त वातावरणामुळे वादाच्या भोवऱ्यात येऊ शतात. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आणखी एका मुस्लिम देशाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन शत्रू राष्ट्रांमध्ये होत असलेल्या हल्ल्यांमुळे एका मुस्लिम देशाला धडकी भरली आहे. भारत आणि पकिस्तानमधील तणाव आणखी वाढल्यास संबंधित मुस्लिम देखील उपासमारीची देखील वेळ येऊ शकते.
सांगायचं झालं तर, भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे, तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. दोन्ही देश एकत्रितपणे आग्नेय आशियातील अनेक देशांमध्ये तांदूळ, कांदे आणि इतर अन्नपदार्थ पाठवतात. अशा परिस्थितीत, दोन्ही देशांमधील कोणत्याही प्रकारचे युद्ध किंवा संघर्ष या वस्तूंच्या पुरवठ्यावर आणि किमतींवर थेट परिणाम करू शकतो.
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर आणि पाकिस्तानने केलेल्या प्रत्युत्तरानंतर मलेशिया सर्वात जास्त चिंतेत आहे. मलेशियाचे अन्न सुरक्षा मंत्री मोहम्मद साबू यांनी साउथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये म्हटले आहे की, जर तणावाचा बंदरे किंवा वितरण पायाभूत सुविधांवर परिणाम झाला तर त्यांच्या देशाच्या तांदळाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.
मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूर यांसारखे देखील तांदळासाठी भारत आणि पाकिस्तानवर आधारित आहे. मलेशिया त्याच्या एकूण तांदळाच्या वापराच्या फक्त 50 टक्के उत्पादन करतो, तर उर्वरित तांदळासाठी संबंधित देश भारत, पाकिस्तान, व्हिएतनाम आणि थायलंड यांच्यावर अवलंबून आहेत. त्यांना 40 टक्के तांदूळ फक्त भारत आणि पाकिस्तानमधून येतो.
मलेशियाकडे सध्या 6 महिने पुरेल एवढा तांदळाचा साठा आहे. पण किंमती वाढल्यानंतर अडचणी वाढू शकतात. भारतातील स्वस्त तांदळाने जागतिक बाजारपेठेत वर्चस्व गाजवले आहे. जर तणाव वाढला तर किमती वाढू शकतात. मलेशिया आधीच देशांतर्गत तांदळाच्या संकटाचा सामना करत आहे. जर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढला तर हे संकट अधिक गंभीर होऊ शकते.