निवडणूक आयोगाने मोदी शाहांच्या सोयीनुसार टीएमसीचे बालेकिल्ले विभागले का? : ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर तृणमूल काँग्रेसचे बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यांमधील मतदान 3 टप्प्यांमध्ये विभागल्याचा गंभीर आरोप केलाय.

निवडणूक आयोगाने मोदी शाहांच्या सोयीनुसार टीएमसीचे बालेकिल्ले विभागले का? : ममता बॅनर्जी


कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर तृणमूल काँग्रेसचे बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यांमधील मतदान 3 टप्प्यांमध्ये विभागल्याचा गंभीर आरोप केलाय. तसेच हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोयीनुसार केलंय का? असा सवालही केला. त्या निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालची निवडणूक 3 टप्प्यांमध्ये घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली (Mamata Banerjee criticize Election Commissioner over three phage election in West Bengal).

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी निवडणूक आयोगाचा आदर करते, मात्र त्यांनी जिल्ह्यांची विभागणी का केली? पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्हा तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी 3 टप्प्यात मतदान विभागण्यात आलंय. हे मोदी शाहांच्या सोयीनुसार करण्यात आलंय का?”

“केंद्र सरकार त्यांच्या मंत्रिपदाचा आणि शक्तीचा राज्यांच्या निवडणुकीत दुरुपयोग करु शकत नाही. जर त्यांनी असं केलं तर ती त्यांची खूप मोठी चूक असेल. त्यांना त्याच्या परिणामांना सामोरं जावं लागेल. आम्ही सामान्य लोक आहोत. आम्ही आमचं युद्ध लढू. आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करतो की त्यांनी पैशांचा दुरुपयोग थांबवावा. भाजपने पश्चिम बंगालमधील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध मार्गांनी पैसे पाठवले आहेत,” असंही ममता बॅनर्जी यांनी नमूद केलं.

“केंद्रीय गृहमंत्र्यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत त्यांच्या अधिकारांचा दुरुपयोग करु नये”

यावेळी ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निवडणुकीत सत्तेचा आणि अधिकारांचा दुरुपयोग केल्याचाही आरोप केला. त्या म्हणाल्या, “केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशासाठी काम करायला हवं. ते पश्चिम बंगालमधील निवडणुकीसाठी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करु शकत नाही. आम्ही पंतप्रधानांचं स्वागत करतो, मात्र त्यांना पश्चिम बंगालमधील निवडणुकीत त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करु देणार नाही. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालला स्वतःचं राज्य म्हणून बघावं, भाजपच्या नजरेतून या राज्याकडे बघू नये, अशी माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे.”

हेही वाचा :

पश्चिम बंगाल : मेदिनीपूर जिल्ह्यात बॉम्ब हल्ल्यात TMC च्या कार्यकर्त्याचा मृत्यू, दोघे गंभीर

ममता बॅनर्जींच्या सुनेची सीबीआयकडून दीड तास चौकशी; बँकॉकमधील व्यवहारांचा हिशोब मागितला

ममता बॅनर्जींनंतर त्यांच्या कुटुंबातून केवळ ही व्यक्ती ‘मुख्यमंत्री’ पदाची दावेदार, भाजपकडून घेरण्याची तयारी

व्हिडीओ पाहा :

Mamata Banerjee criticize Election Commissioner over three phage election in West Bengal

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI