AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal : ममता बँनर्जींना धक्का! 45 आमदारांनी थेट… पराभवानंतर पक्षात फूट?

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बँनर्जी यांच्या पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज पक्षाच्या 45 आमदारांनी बँनर्जी यांचा आदेश डावलल्याचे समोर आले आहे.

West Bengal : ममता बँनर्जींना धक्का! 45 आमदारांनी थेट... पराभवानंतर पक्षात फूट?
mamata banerjee tmcImage Credit source: Google
| Updated on: May 20, 2026 | 7:43 PM
Share

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. यानंतर आता ममता बँनर्जी यांच्या पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज (बुधवार) पक्षाकडून एका मोठ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या आंदोलनाला अनेक टीएमसी आमदार गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पक्षातील अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

टीएमसीच्या 45 आमदारांची आंदोलनाकडे पाठ

समोर आलेल्या माहितीनुसार, टीएमसीच्या काही आमदारांनी आज विधानसभा परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचार आणि फेरीवाल्यांवरील कारवाईविरोधात धरणे आंदोलन केले. यावेळी शोभनदेव चट्टोपाध्याय, नयना बॅनर्जी, कुणाल घोष आणि ऋतब्रत बॅनर्जी या नेत्यांसह 80 पैकी केवळ 35 आमदार उपस्थित होते. त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद आणि संभाव्य फुटीच्या चर्चांना बळ मिळाले आहे. मात्र टीएमसीचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी मात्र पक्षात अंतर्गत कलह असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

आमदार का गैरहजर?

चट्टोपाध्याय यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘आजच्या कार्यक्रमात सुमारे 35 आमदार उपस्थित होते. निवडणुकीनंतर हिंसाचारग्रस्त भागांमध्ये कार्यकर्त्यांसोबत अनेक आमदार व्यस्त असल्याने ते येऊ शकले नाहीत. शिवाय हा कार्यक्रम फक्त एका दिवसाच्या नोटिशीवर आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे दूरच्या भागातील आमदारांना सहभागी होणे शक्य झाले नाही.’

आगामी काळात टीएमसी रस्यावर उतरण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी आणि राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. यावेळी काही आमदारांनी निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष नेतृत्व रस्त्यावर उतरून आंदोलन करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी अनेक आमदारांनी स्पष्टपणे सांगितले की, बंद खोलीत बैठका घेऊन आपला गमावलेला जनाधार परत मिळवण्याचा प्रयत्न करणे पक्षासाठी फायदेशीर ठरणार नाही. त्यामुळे आता आगामी काळात टीएमसी नेते आगामी काळात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलने करताना दिसण्याची शक्यता आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला